Narayana English Medium School

बदलापूरमधील नारायणा इंग्लिश मीडियम स्कूलविरोधात शिक्षण विभागाची मोठी कारवाई; अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर बदलापूरमधील एका शाळेविरोधात शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत.

बदलापूरमधील नारायणा इंग्लिश मीडियम स्कूलविरोधात शिक्षण विभागाची मोठी कारवाई; अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा

Narayana English Medium School

शासकीय मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू; एक लाखांचा दंड, दररोज १० हजार रुपयांचा अतिरिक्त दंड

ठाणे : शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर बदलापूरमधील एका शाळेविरोधात शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. आवश्यक शासकीय मान्यता न घेता शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतल्याप्रकरणी बदलापूर येथील नारायणा इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दंडात्मक कारवाई आणि गुन्हा नोंदवूनही शाळा सुरूच असल्याचे समोर आले आहे.

बदलापूरच्या शिरगाव परिसरातील या शाळेविरोधात अंबरनाथचे गटशिक्षणाधिकारी विशाल पोतेकर यांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षण विभागाने यापूर्वीच या शाळेला अनधिकृत घोषित करून ती बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.

विद्यार्थी आणि पालकांना सतर्क करण्यासाठी शाळेबाहेर प्रवेश घेऊ नये, असा फलकही शिक्षण विभागाने लावला होता. मात्र, या आदेशांकडे दुर्लक्ष करत शाळा प्रशासनाने यंदाही प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली. त्यामुळे शाळेवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, यापुढे प्रतिदिन १० हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी विशाल पोतेकर यांनी दिली.

शाळा प्रशासनाविरोधात यापूर्वीही पालक आणि विद्यार्थ्यांकडून सातत्याने तक्रारी होत होत्या. आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप पालकांनी केला होता. तसेच काही शाळांकडून पाठ्यपुस्तकांसाठी अतिरिक्त पैशांची मागणी करण्यात येत असल्याच्याही तक्रारी समोर आल्या होत्या.

अनधिकृत शाळेला थेट सील करण्याचा किंवा बंद करण्याचा अधिकार शिक्षण विभागाकडे नसल्याने संबंधितांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अद्याप शाळा सुरू असल्याने तेथे शिक्षण घेणाऱ्या पहिली ते दहावीच्या ५३८ विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणावर शाळा प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शाळा प्रशासनाने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणी शाळा प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026
हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026