हिंगोली (Har Ghar Tricolor-2026) : शासनाच्या 'हर घर तिरंगा-2026' मोहिमेअंतर्गत हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने आज तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. नगरपरिषद अध्यक्षा रेखा श्रीराम बांगर, उपाध्यक्ष माबुदभाई बागवान आणि मुख्याधिकारी श्रीमती प्रांजली मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली ही रॅली काढण्यात आली. नगरपरिषद कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली अग्रसेन महाराज चौक, इंदिरा चौक, गांधी चौक, जवाहर रोड, पोस्ट ऑफिस रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जिल्हा परिषद शाळा या मार्गाने जात पुन्हा नगरपरिषद कार्यालय येथे समाप्त झाली.
रॅलीत योग विद्याधामचे सदस्य तसेच शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत देशभक्तीचा उत्साह दाखवला. हातात तिरंगे घेऊन आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

या (Har Ghar Tricolor-2026) रॅलीमध्ये नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, कर व प्र.सेवा अधिकारी सचिन पवार, लेखाधिकारी स्वप्नील बोराटे, प्रभारी नगर अभियंता स्नेहल आवटे, संगणक अभियंता रामेश्वर चाटे, विद्युत अभियंता साहेब भुरके, रचना सहाय्यक गजानन काळे, स्वच्छता निरीक्षक आकाश देशमुख, विनय साहू, संदीप घुगे, शिवाजी घुगे, विजय रामेश्वरे, संजय दोडल, पंडित मस्के, संदीप गायकवाड, कैलास थिटे, विनोद शिंदे, एजाज पठाण, नितीन, प्रविण चव्हाण, पहिनकर, राजेश डहाळे, नागेश नरवाडे, मनोज बुर्से, दिनेश वर्मा, विजय शिखरे, सुरेश वाव्हळे, संजू गायकवाड, चित्रा वर्मा, अनुराधा बांगर, ललिता खंदारे, सुमन बनसोडे, पूर्वा मुदगल, शितल मुसळे, गजानन जगताप, गणेश बांगर, मनीष दराडे यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
'हर घर तिरंगा' या (Har Ghar Tricolor-2026) अभियानाचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी अशी उपक्रम महत्त्वाचे आहेत, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.