हिंगोली पोलिस अधिकारी

जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकार्‍यांचा खांदेपालट; आणखी बदल्या होणार

Hingoli Police Officer: सपोनि उमाकांत पुणे यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी काढले आहेत. जिल्ह्यात आणखी काही पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या होणार असल्याचे संकेत

जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकार्‍यांचा खांदेपालट; आणखी बदल्या होणार

Hingoli Police Officer

हिंगोली (Hingoli Police Officer) : जिल्हा पोलिस दलातील दोन अधिकार्‍यांचा खांदेपालट झाला आहे. ज्यामध्ये वसमत ग्रामीण ठाण्याचे सपोनि रामदास निरदोडे यांच्या जागेवर कळमनुरी ठाण्यातील सपोनि उमाकांत पुणे यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी काढले आहेत. जिल्ह्यात आणखी काही पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

हिंगोली जिल्ह्यात १३ पोलिस ठाणे आहेत. तत्कालिन पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्हातंर्गत अनेक पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या होत्या. कालांतराने त्यांची नांदेड येथे बदली झाली. त्यांच्या जागेवर आलेले पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी पदभार स्विकारल्या नंतर जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. काही पोलिस ठाणे हद्दिमध्ये गुन्हेगारीच्या वाढत्या घटना तसेच कायदा व सुव्यवस्था निर्माण होणारे प्रश्न आदींची माहिती घेतली जात होती.

९ ऑगस्टला (Hingoli Police Officer) दोन पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश डॉ. श्रेणिक लोढा यांनी काढले. ज्यामध्ये वसमत ग्रामीण ठाण्याचे सपोनि रामदास निरदोडे यांना पोलिस नियंत्रण कक्ष हिंगोली तर त्यांच्या रिक्त जागेवर कळमनुरीचे सपोनि उमाकांत वैजनाथ पुणे यांची नियुक्ती केली. पोलिस अधिक्षकांच्या रडावरवर आणखी काही पोलिस अधिकारी असल्याने लवकरच त्यांचाही खांदेपालट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीत आयजींच्या दौर्‍यामुळे पोलिसांचे छापे; २६ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल

हिंगोलीत आयजींच्या दौर्‍यामुळे पोलिसांचे छापे; २६ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल

Hingoli Police Raids: नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे आज २० ऑगस्टला हिंगोलीत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये गुन्हे आढावा व जनसंवाद बैठक त्यानंतर कळमनुरी पोलिस..

Aug 19, 2026
पुणे गोळीबार प्रकरणानंतर पोलीस दलात मोठी खांदेपालट; ३९ पोलीस कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

पुणे गोळीबार प्रकरणानंतर पोलीस दलात मोठी खांदेपालट; ३९ पोलीस कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पुणे पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत.

Aug 05, 2026
हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्याला आतापर्यंत लाभले १९ पोलीस अधीक्षक

हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्याला आतापर्यंत लाभले १९ पोलीस अधीक्षक

Hingoli Police: जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ रोजी झाली आणि त्यानंतरपासून जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेची धुरा सांभाळण्यासाठी आतापर्यंत १९ पोलीस अधीक्षकांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला

Jul 06, 2026
तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी बदली केलेल्या चर्चेतील ३९ पोलिसांना फेर आदेशाचे लागले डोहाळे

तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी बदली केलेल्या चर्चेतील ३९ पोलिसांना फेर आदेशाचे लागले डोहाळे

Superintendent of Police Transfer: जिल्हा पोलिस अधिकारींच्या सर्वसाधारण बदलाने हिंगोलीत अन्याय आणि लघबळ उडवले. नूतन अधीकक्षकांनी पूर्वीच्या आदेशावर फेरपणाचा अपेक्षा केला

Jun 28, 2026
हिंगोलीचे नूतन पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी स्विकारला पदभार

हिंगोलीचे नूतन पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी स्विकारला पदभार

SP Shrenik Lodha: हिंगोली जिल्ह्यांत नूतन पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी २५ जून रोजी हिंगोलीच्या जिल्हा पोलिसाधिक्षक पदभार स्वीकारला.

Jun 25, 2026