बारावीच्या निकालात हिंगोली जिल्हा विभागात शेवटच्या स्थानावर

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा बारावीचा निकाल २ मे रोजी दुपारी जाहिर झाला आहे.

बारावीच्या निकालात हिंगोली जिल्हा विभागात शेवटच्या स्थानावर

Hingoli Result

सलग तिसर्‍या वर्षी जिल्ह्याचा आलेख घसरता; जिल्ह्याचा निकाल ८२.८६ टक्के

हिंगोली (Hingoli Result) : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा बारावीचा निकाल २ मे रोजी दुपारी जाहिर झाला आहे. छत्रपती संभाजी नगर विभागात जिल्ह्याचा निकाल सतत तिसर्‍या वर्षीही घसरल्याने शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सन २०२४ मध्ये जिल्ह्यचा निकाल ९१.८८ टक्के होता. त्यानंतर सन २०२५ मध्ये यामध्ये ३.३४ टक्क्यांनी घट होऊन ८८.५४ टक्के लागला. तर तिसर्‍या वर्षी यंदाचा निकाल मात्र कमालीचा घसरला असून ८२.८६ टक्के निकाल लागला आहे. उतरत्या क्रमांकाने जिल्हा पाचव्या म्हणजे विभागात शेवटच्या क्रमांकावर आला आहे.

बारावीच्या परिक्षांचा निकाल २ मे रोजी दुपारी जाहिर झाला. या निकालात हिंगोली जिल्ह्याचा टक्का घसरला असून विभागात पाचव्या क्रमांकावर आला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पेक्षा ५.९८ टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे.बारावी शालांत परिक्षा मराठवाडा विभागाचा एकुण निकाल ८८.६८ टक्के लागला आहे. यामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्हा ९०.८२ टक्के उत्तीर्णतेसह प्रथम क्रमांकावर आहे. दुसर्‍या क्रमांकावर बीड जिल्ह्याचा ९०.१४ टक्के निकाल लागला आहे. तिसर्‍या क्रमांकावर परभणी जिल्हा असून उत्तीर्णतेची टक्केवारी ८७.६९ एवढी आहे. तर चौथ्या क्रमांकावर जालना जिल्हा असून उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.१७ एवढी आहे. शेवटी पाचव्या क्रमांकावर हिंगोली जिल्हा असून या जिल्ह्याची टक्केवारी ८२.८६ टक्के आहे. सन २०२४ मध्ये हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला होता. यामध्ये ३.३४ टक्क्यांनी घसरण होऊन गतवर्षी ८८.५४ टक्के निकाल लागला होता. तर यावर्षी जिल्हा गतवर्षीपेक्षा ५.९८ टक्क्यांनी घसरला असून निकाल ८२.८६ टक्के लागला आहे.
हिंगोली जिल्ह्याचा बारावी निकालात आढावा घेतला असून फेब्रुवारी २०२० मध्ये जिल्ह्याचा निकाल ८८.५४ टक्के लागला होता. यावेळी हिंगोली जिल्हा विभागात तिसर्‍या क्रमांकावर राहिला होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये जिल्ह्याचा निकाल ९९.८१ टक्के लागला होता. यावेळी जिल्हा विभागात दुसर्‍या क्रमांकावर राहिला. फेब्रुवारी २०२२ मध्ये ९३.५२ टक्के निकाल लागला. जिल्हा चौथ्या क्रमांकावर राहिला. फेब्रुवारी २०२३ मध्ये ८६.३० टक्के निकाल लागला. यावेळी निकालात मोठी घसरण झाली. परंतु फेब्रुवारी २०२४ मध्ये निकालाच्या टक्केवारीत वाढ होऊन ९१.८८ टक्के निकाल जाहिर झाला होता परंतु ही वाढ कायम राहिली नसून गतवर्षी जिल्हा चौथ्या स्थानावर राहिला होता. तर यावर्षी जिल्हा शेवटच्या स्थानावर पोहचला  आहे. 

विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल!

जिल्ह्याचा शाखानिकाल बारावीचा निकाल पाहिला असता सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा लागला आहे. या शाखेत ७ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली असता ७ हजार ६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९२.८६ टक्के लागला आहे. त्या खालोखाल कला शाखेचा विचार केला असता जिल्ह्यातून ५ हजार ९९३ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असता ४ हजार १०२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ७१.०५ टक्के लागला आहे. तर त्या पाठोपाठ वाणिज्य शाखेसाठी केवळ ७०० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असता ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७१.७९ टक्के लागला आहे. 

कळमनुरी तालुका यंदाही पिछाडीवरच!

जिल्ह्यात कळमनुरी तालुक्याचा शिक्षणात तिसरा क्रमांक यंदाही कायम राहिला आहे. विशेष म्हणजे प्रथम स्थानावर असलेल्या हिंगोली तालुक्याचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.२६ असताना कळमनुरी मात्र ७८.८६  टक्के घेऊन जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावर ९.४ टक्क्यांनी मागासलेले आहे. दुसर्‍या क्रमांकावर औंढा नागनाथ तालुका असून ८८.०८ टक्के निकाल लागला आहे. तिसर्‍या क्रमांकावर सेनगाव तालुका असून तालुक्याचा निकाल ८१.५३ टक्के आहे. तर चौथ्या क्रमांकावर वसमत तालुक्याचा निकाल ८०.३८ टक्के आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

महाराष्ट्रातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी शुल्क माफी देण्यात आली आहे.

Sep 30, 2026
कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर महासंघाची बैठक झाली. UDISE+ मधील तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन मिळाले.

Sep 29, 2026
दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

Polytechnic Engineering Admission: दहावीनंतर बारावी आणि अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेण्याऐवजी पॉलिटेक्निकमधून पदविका करून अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

Sep 29, 2026
शिक्षक नियुक्तीवरून मिसाळवाडीत वाद चिघळला; शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

शिक्षक नियुक्तीवरून मिसाळवाडीत वाद चिघळला; शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

मिसाळवाडी शाळेतील शिक्षक नियुक्तीवरून वाद चिघळला. ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले असून, प्रशासनाने निर्णय न बदलल्यास मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Sep 19, 2026
SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ४१ वी SET परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता परीक्षा २५ ऑक्टोबरला होणार असून वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल झाला आहे.

Sep 15, 2026