आमदार तान्हाजी मुटकुळे

हराळ ते खंडाळा रस्ता कामासाठी ३४० कोटींचा निधी मंजूर

MLA Tanhaji Mutkule: हिंगोली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांच्या विकसणासाठी 35.70 किमी लांबीच्या सिंमेट रस्त्याचे ₹340 कोटी खर्चासाठी काम मंजूर केले आहे.

हराळ ते खंडाळा रस्ता कामासाठी ३४० कोटींचा निधी मंजूर

MLA Tanhaji Mutkule

 

आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना यश

हिंगोली (MLA Tanhaji Mutkule) : विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे अधिक बळकट करण्यासाठी आणि दळणवळण सुलभ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या हराळ-वरखेडा-केंद्रा-गोरेगाव- चोंडी-मालसेलू-खंडाळा ते राष्ट्रीय महामार्ग १६१ या रस्ता कामासाठी शासनाने तब्बल ३४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी दिली आहे.

या निधी अंतर्गत ३५.७० किलोमीटर लांबीच्या सिंमेट रस्त्याचे काम केले जाणार आहे.हा रस्ता हिंगोली विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रमुख गावांना थेट राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा मुख्य दुवा आहे. शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना शहरात ये-जा करण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे.आता ३४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे या रस्त्याचा कायापालट होणार असून या रस्त्यामुळे विदर्भातील रिसोड तालुक्याशी संपर्क अधिक मजबूत होणार असून, पुढे समृद्धी महामार्गाशी जोडणी सुलभ होईल आणि परिसरातील हजारो नागरिकांची वाहतुकीची अडचण कायमची दूर होणार आहे.

या संदर्भात आ.तान्हाजीराव मुटकुळे यांनी बोलताना सांगितले की ग्रामीण भागाचा विकास हा रस्त्यांच्या दर्जेदार जोडणीवर अवलंबून असतो. मतदारसंघातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी हराळ ते खंडाळा दरम्यानच्या या रस्त्यासाठी ३४० कोटी रुपये मंजूर करून निधीबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले.या रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास आमदार तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी यावेळी व्यक्त केला.व या कामाच्या निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026