कळमनुरी तहसीलमधील नशेत असलेल्या वरिष्ठ सहाय्यकाच्या सोन्याच्या अंगठ्या लांबवल्या

शहरामध्ये एका पाठोपाठ चोर्‍यांचे सत्र सुरू आहे.

कळमनुरी तहसीलमधील नशेत असलेल्या वरिष्ठ सहाय्यकाच्या सोन्याच्या अंगठ्या लांबवल्या

Hingoli Theft

हिंगोली (Hingoli Theft) : शहरामध्ये एका पाठोपाठ चोर्‍यांचे सत्र सुरू आहे. त्यातच आता कळमनुरी तहसील कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक हा नशेत असल्याची संधी साधून हिंगोलीतील गणेशवाडी जि.प. शाळेसमोरून अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांच्या जवळील १ लाख ५ हजार रुपयाच्या पाच सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कळमनुरी तहसील कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक गजानन शिवप्रसाद वाठोरे हे हिंगोलीतील रिसाला बाजार भागात वास्तव्यास असुन २७ मार्च रोजी रात्री ७ च्या सुमारास ते घरी येत असताना नशेमध्ये होते. या संधीचा फायदा अज्ञात दोन चोरट्यांनी घेऊन त्यांचा पाठलाग सुरू केला होता. त्यातच गणेशवाडी भागातील जिल्हा परिषद शाळे समोरील रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेत वरिष्ठ सहाय्यक गजानन वाठोरे यांना नशेमध्ये डुलकी लागली. या डुलकीचा फायदा घेऊन त्यांचा पाठलाग करणार्‍या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील १ लाख ५ हजार रुपयाच्या सोन्याच्या अंगठ्या काढून घेऊन पलायन केले. या प्रकरणी २८ मार्चला हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात २ चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक संदिप मोदे यांच्यासह डि.बी. पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे यांच्यासह पथकाने जाऊन पाहणी केली. परंतु चोरट्याचा  मागोवा पोलिसांना लागला नाही. या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पथकाने पाहणी केली.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे-राऊतांवर पलटवार; पुराव्याशिवाय आरोप होत असल्याचा दावा करत दिशा सालियन प्रकरणावरही सवाल.

Oct 02, 2026
निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

२०२०च्या खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची मोक्का कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी आणि साक्षीदारांनी आरोप नाकारले.

Sep 29, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026