डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जय भीमच्या जयघोषात जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Dr. Babasaheb Ambedkar: हिंगोली जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. विविध उपक्रमांसह, पोलिस बंदोबस्तामुळे उत्सव शांततेत पार पडला.

जय भीमच्या जयघोषात जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Dr. Babasaheb Ambedkar

हिंगोली (Dr. Babasaheb Ambedkar) : संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात आज 14 एप्रिल ला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र भीमसैनिकांनी एकजुटीने जयंतीचा आनंद साजरा केला. पहाटेपासूनच जिल्ह्यातील विविध भागांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानिमित्त ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. बँड, ढोल-ताशाच्या दणदणाटात आणि ‘जय भीम’च्या जयघोषात तरुण-तरुणींसह आबालवृद्ध भीमसैनिक तल्लीन झाले होते. अनेक ठिकाणी भीमगीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले होते. (Dr. Babasaheb Ambedkar) जयंती उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. कुठेही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शहरातील प्रमुख चौक, पुतळा परिसर आणि मिरवणूक मार्गांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. संवेदनशील भागात गस्त वाढवण्यात आली होती. पोलिसांच्या नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यात जयंतीचा उत्सव कोणताही गालबोट न लागता अत्यंत उत्साहात आणि शांततामय वातावरणात पार पडला. ठिकठिकाणी सामाजिक संघटनांनी अन्नदान, रक्तदान शिबिरे यांसारखे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026