डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त

Dr. Babasaheb Ambedkar: १४ एप्रिलला हिंगोलीत डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक पोलीस बंदोबस्त.

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त

Dr. Babasaheb Ambedkar

जयंती शांततेत साजरी करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहन यांचे आवाहन

हिंगोली (Dr. Babasaheb Ambedkar) : १४ एप्रिलला जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने कुठेही अनुचित घटना घडू नये या उद्देशाने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांची सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते.  त्यानिमित्ताने विविध ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुक काढली जाते. हिंगोलीसह वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी या पाच ही तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक कमलेश मिना व ५८ पोलीस अधिकारी, दोन राज्य राखीव पोलीस बलाचे प्लाटुन, दंगाकाबु पथकातील दोन प्लाटुन, ५०३ कर्मचारी, ५१० पुरूष व ११० महिला होमगार्ड, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक तैनात करण्यात आले आहेत.

ज्या ज्या (Dr. Babasaheb Ambedkar) सार्वजनिक महोत्सव समितीने पोलीस ठाण्याकडून रितसर परवानगी घेतली आहे त्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन होवू देवू नका तसेच डिजे वाजवु नका, मद्य सेवन करून जयंतीच्या मिरवणुकीत नाचु नका, वेळ मर्यादेचे पालन करावे व मिरवणुकीचा ठरवून दिलेला मार्ग यावरूनच मिरवणुक काढावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी आवाहन केले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026