हिंगोली अपघाती मृत्यू

हिंगोली जिल्ह्यात चार वर्षांत ६७९ जणांचा अपघाती मृत्यू; ४४७ जण जखमी

Hingoli accidental death: हिंगोली जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत अपघातात ६७९ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ४४७ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पोलीस प्रशासनाने विशेष जनजागृती उपक्रम सुरू केला आहे.

हिंगोली जिल्ह्यात चार वर्षांत ६७९ जणांचा अपघाती मृत्यू; ४४७ जण जखमी

Hingoli accidental death

सायंकाळी ६ ते ९ ही वेळ ठरतेय ‘डेथ अवर’

हिंगोली (Hingoli accidental death) : जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. पोलिस प्रशासनाने जनजागृतीसाठी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत म्हणजेच २०२३ ते एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात एकूण ६७९ निष्पाप नागरिकांचा अपघातात बळी गेला आहे, तर ४४७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

जिल्हाभरात सन २०२३ मध्ये १६० जणांचा मृत्यू तर ९३ जण गंभीर जखमी झाले. २०२४ मध्ये हा आकडा वाढून १९८ मृत्यू आणि १२३ गंभीर जखमी असा झाला. २०२५ मध्ये परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून २३३ जणांना प्राण गमवावे लागले, तर १८० जण जखमी झाले. चालू वर्षी एप्रिल २०२६ पर्यंत ८८ जण दगावले असून ५१ जण गंभीर जखमी आहेत.
या आकडेवारीचे विश्लेषण करताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एकूण अपघातांपैकी तब्बल ६० टक्के अपघात दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत झाले आहेत.

विशेषतः सायंकाळी ६ ते रात्री ९ ही वेळ सर्वात धोकादायक ठरत असून या तीन तासांतच ३० टक्के अपघात (Hingoli accidental death) घडले आहेत. वेळेनुसार पाहिल्यास, २०२३ ते २०२६ या काळात दुपारी ३ ते ६ दरम्यान १०७ जणांचा मृत्यू झाला, सायं ६ ते रात्री ९ दरम्यान २०५ जण दगावले, तर रात्री ९ ते १२ या वेळेत ९३ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांनी १ मार्चपासून 'पोलीस तुमच्या दारी' हा विशेष जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत सायंकाळी ६ ते रात्री ९ या 'डेथ अवर'मध्ये महामार्ग व शहरातील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहनचालकांचे समुपदेशन केले जात आहे. हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट, वेगमर्यादा, मद्यपान करून वाहन न चालवणे याबाबत प्रबोधन केले जात आहे.  अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. आपला एक निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो. विशेषतः सायंकाळच्या वेळेत अधिक सतर्क राहून वाहन चालवावे. चार वर्षांत ६७९ घरे पोरकी करणारे हे आकडे थांबवण्यासाठी पोलिसांसोबतच नागरिकांनीही जबाबदारीने वागावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी केले आहे.

नाकाबंदी लावून अपघाताचे प्रमाण कमी करण्यावर दिला जाणार भर 

अपघातांचे (Hingoli accidental death) हे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन व अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. १ मार्च २०२६ पासून जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणांवर सायं. ६ ते रात्री ९ या वेळेत काटेकोर नाकाबंदी लावण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखा दररोज ही कारवाई करत आहेत. नाकाबंदी दरम्यान वाहनचालकांची तपासणी करून हेल्मेट, सीट बेल्ट, वेगमर्यादा, मद्यपान करून वाहन चालवणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर शाळा, कॉलेज, चौक व बाजारपेठांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृतीही केली जात आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026