हिंगोली पीडीसी बँक

हिंगोलीतील पीडीसी बँकेत वयोवृध्दासह अनेक खातेदार उन्हा-तान्हात

Hingoli PDC Bank: हिंगोलीतील पीडीसी बँकेसमोर अनेक लाभार्थ्यांनी अनुदान घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. विविध योजनांतून आलेल्या अनुदानाच्या रक्कमासाठी उच्च गर्दी झाली.

हिंगोलीतील पीडीसी बँकेत वयोवृध्दासह अनेक खातेदार उन्हा-तान्हात

Hingoli PDC Bank

शासनाच्या विविध  योजनेचे अनुदान  लाभार्थ्यांच्या खात्यावर  झाले जमा 
रक्कम उचलण्या साठी झाली गर्दी

हिंगोली (Hingoli PDC Bank) : येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेसमोर विविध योजनेतील लाभार्थ्यांनी अनुदानाची रक्कम घेण्यासाठी ६ एप्रिल सोमवार रोजी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत २५ ते ३० गावे जोडण्यात आली आहेत. सध्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहे. मागील आठवड्यात सलग सुट्ट्या, तसेच मार्च अखेर असल्याने (Hingoli PDC Bank) बॅकेतील आर्थिक व्यवहार सुरू असल्याने विविध योजनेतील अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊन त्यांना मिळाले नव्हते.  आता मार्च महिन्या स़ंपल्याने बॅकेतील आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.

सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने शासनाच्या लाडकी बहिण योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, शेतकरी विमा, संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार योजना अशा योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले आहे. हे अनुदान घेण्यासाठी लाभार्थ्यांनी भर उन्हात बॅक शाखेच्या समोर रांगा लावल्या होत्या.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजारांचे अनुदान मिळते ती रक्कम लाभार्थ्यांना तीन हप्त्यात दोन हजार रुपये प्रमाणे दिले जाते त्याचे दोन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहे.तसेच शासनाची लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे दिड हजार रुपये, तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १,५०० रुपये अनुदान दिले जाते त्या योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या (Hingoli PDC Bank) बँक खात्यात जमा झाले आहे.

या सर्व योजनेचे लाभार्थ्यांनी सोमवारी बॅकेसमोर मोठी गर्दी केली होती. भर उन्हात लाभार्थ्यांनी बॅकेच्या शाखे समोर रांगा लावल्या होत्या. सलग सुट्ट्यांमुळे शाखेत सोमवार लाभार्थ्यांची गर्दी झाली होती. सर्वांना विड्राल प्रमाणे रक्कम दिली जात असल्याचे बॅक व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान या सर्व लाभार्थ्यांना एटीएम दिले आहे मात्र लाभार्थी त्याचा उपयोग न करता सरळ बॅकेत अनुदान घेण्यासाठी येत असल्याने बॅकेत गर्दी होत आहे चलना प्रमाणे प्रत्येकांना रक्कम देण्यात आली. ज्यांना बॅकेचे एटीएम मिळाले आहे अशा लाभार्थ्यांनी बॅकेत गर्दी न करता एटीएम चा उपयोग घेतला पाहिजे, असे (Hingoli PDC Bank) बॅकेचे शाखा व्यवस्थापक आनंदराव मांडगे यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026