परभणीतील गंगाखेड शहरातील रजा कॉलनीत घरफोडी

गंगाखेड शहरातील रजा कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

परभणीतील गंगाखेड शहरातील रजा कॉलनीत घरफोडी

House Burglary

गंगाखेड (House Burglary) : गंगाखेड शहरातील रजा कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी २२ मे रोजी गंगाखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सय्यद मोईज यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे पत्नी आणि मुलाबाळांसह १७ मे रोजी सासरवाडी चाकूर येथे गेले होते. २० मे रोजी मध्यरात्री शेजाऱ्यांनी फोन करून त्यांच्या घरातून अज्ञात व्यक्ती पळून गेल्याची माहिती दिली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्यादी घरी आल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी २४ तोळे चांदीचे दागिने, ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच ६० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचे आढळून आले.

या प्रकरणी गंगाखेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, चोरट्यांनी शेजारील कॉलनीत राहणाऱ्या निर्मला पाटेकर यांच्या घरी देखील चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026