कान्हेगावात २ लाख १० हजारांची घरफोडी

परिसरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून सातत्याने होत असलेल्या चोऱ्यांमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कान्हेगावात २ लाख १० हजारांची घरफोडी

House Burglary

आखाडा बाळापूर (House Burglary) : परिसरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून सातत्याने होत असलेल्या चोऱ्यांमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कान्हेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कान्हेगाव येथील लक्ष्मण नंदकिशोर पाटील यांच्या जुन्या घराच्या माडीवर २२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास चोरट्यांनी शिडीच्या सहाय्याने प्रवेश केला. देवघरातून घरात प्रवेश करून त्यांनी लोखंडी कपाटाचे कुलूप तोडले.

कपाटातील रोख १ लाख रुपये, ५० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ३० हजार रुपये किमतीची दुसरी सोन्याची अंगठी तसेच ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, पोलीस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, शिवाजी पवार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ पथकानेही तपासणी केली.

मागील काही दिवसांपासून आखाडा बाळापूर शहरासह शेवाळा, देवजना आणि कान्हेगाव परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शेतशिवार तसेच कयाधू नदीकाठ परिसरातही मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असल्याने शेतकरी व नागरिक त्रस्त झाले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026