बंद असलेल्या गोरगरिबांच्या घरकुल कामाकरिता जबाबदार कोण?

जनतेला आठ दिवसात घरकुलांकरिता रेती उपलब्ध करून न दिल्यास विराट जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

बंद असलेल्या गोरगरिबांच्या घरकुल कामाकरिता जबाबदार कोण?

Housing Scheme

रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांना घरकुलाकरिता रेती उपलब्ध करून द्यावे!

चामोर्शी (Housing Scheme): रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील की मौजा मंजेगाव, मछली, शामनगर, सिमूलतला, मक्केपल्ली, चापलवाडा,विकासपल्ली, रेगडी माडेआमगाव, पोतेपल्ली व जवळचे अनेक गावातील नागरिकांना राज्य सरकारच्या पंचायत समितीचे वतीने घरकुल मिळालेले आहेत. परंतु राज्य सरकारच्या वतीने अजून पर्यंत या भागातील नागरिकांना रेती घाट उपलब्ध न दिल्याने येथील घरकुलाचे काम सुरू झालेले नाहीत व घरकुलचे काम पूर्णपणे बंद आहेत. तरी या भागातील नागरिकांकरिता निदान आमगाव घाट,अथवा साखरदेव घाट तात्काळ सुरू करण्यात यावे व सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना घरकुल करिता रेतीची उपलब्धता करून द्यावे अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे वतीने करण्यात आलेली आहे. तसेच प्रशासनाने प्रशासनाने तालुक्यातील जनतेला आठ दिवसात घरकुलांकरिता रेती उपलब्ध करून न दिल्यास विराट जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

आठ दिवसात प्रशासनाने घरकुलाकरिता रेती उपलब्ध करून न  दिल्यास विराट जन आंदोलन!

यावेळी तहसील कार्यालयाकडून तहसीलदार घारुडे साहेब यांच्या कडून असे कळले साखरदेव घाट वनविभागाच्या अधीन असल्याने वनपरवानगी मिळाल्याशिवाय सदर घाट सुरू करने शक्य नाही? तसेच चामोर्शी तालुक्यातील आमगाव घाट लिलावात दिल्यामुळे सदर घाट जोपर्यंत कंत्राटदार आपल्या हाती घेत नाही तोपर्यंत दहा टक्के रेती नागरिकांना देणे शक्य नाही? त्यामुळे या भागातील घरकुल पूर्ण करण्यासाठी रेती बाबत खूप मोठा ग्रहण प्रश्न निर्माण झालेला आहे?

यावेळी मंजेगाव येथील अनेक नागरिकांनी तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्या नेतृत्वात भेट घेतली. यावेळी मंजेगाव येथील माजी सरपंच रमेश लेकलवार, बोंकंटीवार पाटील,राजू सातपुते, संदीप भोवरे, पलाश घरामी, सुमेन विस्वास व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, संघटन नेते प्रवीण गेडाम व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026