अतिक्रमण हटाव की अमानुषता? वृद्ध भाजी विक्रेत्या महिलेवर कारवाईने संताप

बीड शहरात मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे.

अतिक्रमण हटाव की अमानुषता? वृद्ध भाजी विक्रेत्या महिलेवर कारवाईने संताप

Humanity First

नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या कारवाईवर नागरिकांचा संताप; प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

बीड (Humanity First) : बीड शहरात मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी विक्रीसाठी आलेल्या एका वृद्ध महिलेचा भाजीपाला, डबा आणि इतर साहित्य थेट कचऱ्याच्या गाडीत टाकल्याचा आरोप होत असून या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिला उदरनिर्वाहासाठी रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्री करत होती. मात्र अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान नगर परिषद कर्मचाऱ्यांनी तिच्याकडील भाजीपाला, टोपली आणि इतर साहित्य जबरदस्तीने उचलून कचऱ्याच्या गाडीत टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेदरम्यान वृद्ध महिला रडत विनवण्या करत असल्याचे सांगितले जात आहे. “गरिबीमुळे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी या वयात भाजी विक्री करत होते, तेही हिरावून घेतले,” अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत अशा अमानुष वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अतिक्रमण हटाव मोहिम राबविताना गरिब आणि वृद्ध व्यक्तींशी मानवीय दृष्टिकोनातून वागणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणावर नगर परिषद प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र या घटनेमुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026