हिंगोली LIGO प्रोजेक्ट

हिंगोली जिल्ह्यातील LIGO प्रकल्पाच्या रस्त्याच्या कामात तफावत; बाधित शेतकऱ्यांनी दिले निवेदन

Hingoli LIGO Project: हिंगोली येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय लिगो प्रकल्पासाठी तयार होणाऱ्या मुख्य पोच रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याचा आरोप करत दुघाळा, बोरजा आणि पिंपळ परिसर..

हिंगोली जिल्ह्यातील LIGO प्रकल्पाच्या रस्त्याच्या कामात तफावत; बाधित शेतकऱ्यांनी दिले निवेदन

Hingoli LIGO Project

हिंगोली (Hingoli LIGO Project) : हिंगोली येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय लिगो प्रकल्पासाठी तयार होणाऱ्या मुख्य पोच रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याचा आरोप करत दुघाळा, बोरजा आणि पिंपळ परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी 14 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश जोशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी माजी समाजकल्याण आयुक्त दीपकराव वडकुते, डॉक्टर रमेश मस्के, भास्कर पोले,  गोपाल सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यासाठी मूळ मंजूर करण्यात आलेला आराखडा आणि प्रत्यक्षात सुरू असलेले रुंदीकरणाचे काम यांच्यात मोठी तफावत आहे. त्यामुळे अनेकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त जमीन बाधित होत आहे. याशिवाय प्रत्यक्षात ताब्यात घेतल्या जाणाऱ्या जमिनींचे गट क्रमांक, मोजमाप आणि सातबाऱ्यावरील नावांमध्येही तफावत दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवेदनात बाधित शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारचा कायदेशीर मोबदला न मिळाल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. मोबदला आणि पुनर्वसनाबाबत प्रशासनाने तात्काळ स्पष्टता द्यावी आणि योग्य भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत जमिनींची मोजणी दुरुस्त केली जात नाही आणि मोबदल्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम तात्पुरते स्थगित ठेवावे अशी विनंतीही करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या या (Hingoli LIGO Project) निवेदनाची गांभीर्याने दखल घेत कार्यकारी अभियंता श्री. सुरेश जोशी यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले. निवेदनातील मुद्द्यांची छाननी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.  LIGO सारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामात पारदर्शकता ठेवून बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026