Illegal Activities

अवैध धंद्यांविरोधात भाजप आक्रमक; पोलीस अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन

रिसोड तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

अवैध धंद्यांविरोधात भाजप आक्रमक; पोलीस अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन

शिरपूर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याची मागणी; निवेदनाची सकारात्मक दखल

रिसोड : रिसोड तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हे अवैध धंदे तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी वाशिमचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार हे निवेदन देण्यात आले. शिरपूर परिसरातील अवैध धंद्यांमुळे युवकांवर विपरीत परिणाम होत असून, सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.

दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनाची पोलीस अधीक्षकांनी सकारात्मक दखल घेतली. अवैध धंद्यांबाबत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. तसेच नागरिकांच्या तक्रारी आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित बाबी गांभीर्याने घेतल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस अधीक्षकांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे शिरपूर परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात पोलिस प्रशासनाकडून नेमकी कोणती पावले उचलली जातात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

निवेदन देताना गजाननराव लाटे, जिल्हा महामंत्री, भारतीय जनता पार्टी वाशिम; सुभाषराव खरात, मंडल अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी रिसोड; अमोल पाटील भुतेकर, ग्रामीण मंडळ अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी रिसोड आणि भूषण दांदडे, महामंत्री, भारतीय जनता पार्टी रिसोड उपस्थित होते.

“अवैध धंदे बंद झालेच पाहिजेत; युवकांचे भविष्य सुरक्षित झालेच पाहिजे,” या भूमिकेसह भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.

संबंधित सामग्री

पश्चिम बंगालचं नाव बदलणार? ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग; भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

पश्चिम बंगालचं नाव बदलणार? ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग; भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

पश्चिम बंगालचं नाव ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग? भाजप प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी विधानसभेत विधेयक मांडण्याचे संकेत दिले.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026