पेट्रोल इंधन पुरवठा

कृत्रिम रित्या इंधन टंचाई निर्माण केल्यास केल्यास होणार कारवाई

Petrol fuel supply: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पेट्रोल पंप चालकांना इंधन पुरवठ्यातील कृत्रिम तुटवड्यापासून बचाव करण्यासाठी निर्देश देण्यात आले. इंधन उपलब्धता, आपत्कालीन सेवा, शेतीकामे

कृत्रिम रित्या इंधन टंचाई निर्माण केल्यास केल्यास होणार कारवाई

Petrol fuel supply


पेट्रोल पंप चालकांच्या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला इशारा

हिंगोली (Petrol fuel supply) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली २९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल पंप चालकांची आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील पेट्रोलियम पदार्थांची उपलब्धता व पुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांच्यासह आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल तसेच नायरा या तेल कंपन्यांचे सेल्स ऑफिसर उपस्थित होते.

बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पेट्रोल पंप चालक आणि मालकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. (Petrol fuel supply) अत्यावश्यक सेवा, आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, शासकीय यंत्रणा तसेच जीवनावश्यक सेवांसाठी आवश्यक इंधनाचा पुरवठा २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावयाची शासकीय कामे, सार्वजनिक बांधकामे, जलसंधारण, रस्ते दुरुस्ती तसेच इतर अत्यावश्यक कामांसाठी कंपनीने निर्धारित केलेल्या नियम व विहित कार्यपद्धतीनुसार डिझेलचा पुरवठा करण्यास सांगण्यात आले. सध्याची ग्राहकांची गर्दी व उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांसाठी पेट्रोल पंपावर पिण्याचे स्वच्छ पाणी, सावलीसाठी प्रतीक्षा व्यवस्था, स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देणे, प्राथमिक उपचार पेटी ठेवणे आणि गर्दी नियोजनासाठी आवश्यक कर्मचारी व सूचना फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. इंधन वितरणाचे नियोजन शक्यतो सकाळच्या वेळेत करावे जेणेकरून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनास आवश्यक सहाय्य व समन्वय प्रभावीपणे करता येईल. इंधन वितरणाबाबत पारदर्शकता राखून अनावश्यक गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तेल कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर व संबंधित अधिकार्‍यांना देखील जिल्हाधिकार्‍यांनी सूचना दिल्या.

सध्याच्या परिस्थितीत शेतकर्‍यांची शेतीविषयक कामे व इतर अत्यावश्यक सेवांचा विचार करून रविवारी देखील डेपो कार्यरत ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. ज्या पेट्रोल पंप चालकांनी आगाऊ मागणी नोंदवून आवश्यक रक्कम जमा केलेली आहे, त्यांना वेळेवर इंधन उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, असे सांगण्यात आले. पेट्रोल पंपांना मागणीनुसार नियमित व वेळेवर पुरवठा करून (Petrol fuel supply) कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले. सुरळीत इंधन पुरवठ्यामुळे शेतीची कामे, अत्यावश्यक सेवा व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी होईल तसेच गर्दी व आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.  बैठकीच्या समारोपात जिल्हाधिकारी गुप्ता यांनी जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन, तेल कंपन्या व पेट्रोल पंप चालक यांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन केले.

त्याचबरोबर नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठेबाजी करू नये तसेच आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या बैठकीत अप्पासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, पेट्रोल विक्रेता संघटनेचे पदाधिकारी सुमित चौधरी, कैलास बांगर, ललीत खुराणा, अजिक्य देशपांडे, राजेश बगडीया, गोपाल चौधरी, राहुल नाईक,विलास काळे, अनिल वर्मा, सुनिल पाटील, अ‍ॅड.सुनिल भुक्तर, हमीद  भाई प्यारेवाले, राजु देशमुख, गणेश चौधरी, सुरेंद्र सावत,  यांच्यासह जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांची उपस्थिती होती.

संबंधित सामग्री

पेट्रोल पंपाच्या वादातुन चोंडीत खंजीराने एकाची हत्या, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

पेट्रोल पंपाच्या वादातुन चोंडीत खंजीराने एकाची हत्या, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

Petrol pump murder case: वसमत तालुक्यातील चोंडी स्टेशन येथील साई उमेश पेट्रोलपंपावर पेट्रोलपंप चालविण्यावरून झालेल्या वादाचा रक्तरंजित शेवट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली.

Oct 07, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित

डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित

Jio-BPच्या काही पंपांवर डिझेल खरेदी 50 लिटरपुरती मर्यादित; Nayara Energyवरही निर्बंध. सरकारी तेल कंपन्यांच्या पंपांवर मात्र सध्या विक्री सुरळीत.

Sep 24, 2026
अरुणावती पेट्रोल पंपावरील मारहाण प्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अरुणावती पेट्रोल पंपावरील मारहाण प्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Arunavati Petrol Pump Assault Case: मानोरा - मंगरूळपीर राष्ट्रीय महामार्गावरील आमगव्हाण फाट्यावरील अरुणावती पेट्रोल पंपावर दि. १९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉड

Sep 20, 2026
अरुणावती पेट्रोल पंपावर कामगाराला लोखंडी रॉडने मारहाण

अरुणावती पेट्रोल पंपावर कामगाराला लोखंडी रॉडने मारहाण

Arunavati Petrol Pump Assault Case: आमगव्हाण गावाजवळ असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव अमोल पाटणकर यांच्या अरुणावती पेट्रोल पंपावर कामगाराला लोखंडी रॉडने  मारहाण

Sep 20, 2026