वनमहोत्सव 2026

वृक्षारोपणाने जिल्हास्तरीय मोहिमेचा आमदार संतोष बांगर यांचे हस्ते शुभारंभ

Vanamahotsav 2026: पर्यावरणपूरक, दीर्घायुषी व भारतीय प्रजातींच्या वृक्षांच्या लागवडीवर विशेष भर देण्यात आला. यामध्ये वड, पिंपळ, बेल, उंबर, आंबा, करंज, लिंब आदी पवित्र व औषधी गुणधर्म असलेल्या वृक्ष

वृक्षारोपणाने जिल्हास्तरीय मोहिमेचा आमदार संतोष बांगर यांचे हस्ते शुभारंभ

Vanamahotsav 2026

कळमनुरी (Vanamahotsav 2026) : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वृक्षलागवडीला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने वनमहोत्सव २०२६ अंतर्गत कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी तसेच शासकीय वैद्यकीय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या  मोहिमेचा जिल्ह्यातील शुभारंभ आमदार संतोष बांगर यांचे हस्ते करण्यात आला.

या  (Vanamahotsav 2026) कार्यक्रमाला सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती पुष्पा पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पर्यावरणपूरक, दीर्घायुषी व भारतीय प्रजातींच्या वृक्षांच्या लागवडीवर विशेष भर देण्यात आला. यामध्ये वड, पिंपळ, बेल, उंबर, आंबा, करंज, लिंब आदी पवित्र व औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी आमदार संतोष बांगर यांच्यासह जिल्हा युवासेना प्रमुख रामभाऊ कदम, विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार, उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, गजानन पाटील, कैलास पारवे संदीप बांगर, मयूर शिंदे, शैलेश उबाळे, संतोष वेरुळकर, ॲड. विश्वनाथ चौधरी, संतोष खर्जुले, अतुल बुर्से, अनिल बुर्से, अनिल शहू, कैलास पवार आदी मान्यवरांनी वृक्षारोपण केले.
कार्यक्रमात केवळ वृक्षलागवड न करता त्यांच्या संवर्धन व जतनाचा संकल्पही करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय कटके (कळमनुरी), संदीप शिंदे (हिंगोली), वनपाल बबन गायकवाड, रितेश भेराणे, वनरक्षक सुधाकर चोपडे, राजू कोटकर, पूजा अंभोरे, सविता फड, वनमजूर बळीराम मंदाडे, मझर खान यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सैनिक शाळेतील शिक्षक-विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमाचे (Vanamahotsav 2026) विशेष आकर्षण म्हणून "एक पेड माँ के नाम" सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता. उपस्थित मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिकांनी येथे सेल्फी काढून वृक्षलागवडीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या संतवचनाची आठवण करून देत असोलवाडी व शासकीय वैद्यकीय परिसरात झालेली वृक्षलागवड संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. तसेच वनमहोत्सवानिमित्त प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात अधिकाधिक वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

संबंधित सामग्री

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत पुणे-सोलापूरमार्गे धावण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे 16 तासांचा प्रवास, सहा दिवस सेवा आणि सात प्रस्तावित थांबे असतील.

Oct 04, 2026
चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीत जयस्तंभ चौक ते खामगाव चौफुली मार्गावर सुरू असलेल्या वृक्षलागवडीची नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पाहणी करून वृक्षसंवर्धनाच्या सूचना दिल्या.

Sep 17, 2026
श्रीनगर विमानतळावर इंडिगो विमान खांबाला धडकले; प्रवासी सुखरूप, विमान वाहतूक सुरळीत

श्रीनगर विमानतळावर इंडिगो विमान खांबाला धडकले; प्रवासी सुखरूप, विमान वाहतूक सुरळीत

इंडिगोच्या विमानांशी संबंधित दोन घटना सलग दोन दिवस समोर आल्या आहेत.

Sep 04, 2026
मुंबई विमानतळावरील टर्मिनल-१च्या दुरुस्तीचा परिणाम; काही उड्डाणे नवी मुंबईला; प्रवाशांची वाढली कसरत

मुंबई विमानतळावरील टर्मिनल-१च्या दुरुस्तीचा परिणाम; काही उड्डाणे नवी मुंबईला; प्रवाशांची वाढली कसरत

टर्मिनल-१च्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी काही विमानसेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू करण्यात आल्या आहेत.

Sep 03, 2026
२७ ऑगस्टला जागतिक तलाव दिन; तलाव आहेत म्हणून पाणी आहे! जाणून घ्या संवर्धनाचे महत्त्व

२७ ऑगस्टला जागतिक तलाव दिन; तलाव आहेत म्हणून पाणी आहे! जाणून घ्या संवर्धनाचे महत्त्व

२७ ऑगस्ट हा दिवस जगभरात ‘जागतिक तलाव दिन’ म्हणून साजरा केला जातो.

Aug 27, 2026