हिंगोली रेल्वे स्थानक पाहणी

हिंगोली रेल्वे स्थानकाची पाहणी करून भाजप नेत्यांची चमकोगिरी; प्रत्यक्षात कृती मात्र शून्य

Hingoli Railway Station: हिंगोली व परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांकडे रेल्वे विभागातर्फे सतत दुर्लक्ष होत आहे, अशात रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून भारतीय जनता पक्ष

हिंगोली रेल्वे स्थानकाची पाहणी करून भाजप नेत्यांची चमकोगिरी; प्रत्यक्षात कृती मात्र शून्य

Hingoli Railway Station

हिंगोली (Hingoli Railway Station) : हिंगोली व परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांकडे रेल्वे विभागातर्फे सतत दुर्लक्ष होत आहे, अशात रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून भारतीय जनता पक्षाच्या काही बड्या नेत्यांनी केलेल्या चमकोगिरीला लोक नावे ठेवत आहेत.

हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे रुंदीकरण होऊन जवळपास १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशात २०१४ पासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. खरे पाहिले तर देशाच्या उत्तर भागाला दक्षिण भागाशी जोडणारा सर्वात महत्त्वाचा रेल्वे मार्ग म्हणजे पूर्णा-खंडवा रेल्वे लाईन असे मानले जाते. असे असले तरी हा मार्ग कायम दुर्लक्षितच राहिला आहे.

ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील केंद्रात मंत्री असताना रेल्वेच्या विविध मागण्यांसाठी हिंगोलीत स्थापन झालेल्या रेल्वे संघर्ष समितीचा संघर्ष तेव्हापासून आजपर्यंत सतत सुरूच आहे. समितीच्या १८ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार गजानन घुगे यांचाही समावेश आहे.

या संघर्ष समितीने फार मोठ्या मागण्या केलेल्या नाहीत. समितीने प्रामुख्याने तीनच मागण्या केल्या आहेत. एक मुंबईसाठी व एक पुण्यासाठी रात्रीकालीन रेल्वे असावी, जी आपल्या गंतव्यावर भल्या पहाटे पोहोचेल व तेथे पोहोचणाऱ्या प्रवाशांना दिवसभर आपले काम करून संध्याकाळी हिंगोलीकडे परत निघता येईल. यासोबतच छत्रपती संभाजीनगर व नागपूर दरम्यान एक रेल्वे चालविण्यात यावी, अशा तीनच मागण्या रेल्वे संघर्ष समितीने केल्या आहेत.

या मागण्या इतक्या सामान्य आहेत की सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी थोडा जरी जोर लावला तरी रेल्वे मंत्रालय त्यांच्या मागणीला मान देऊ शकते; परंतु प्रत्यक्षात कृती करण्याऐवजी केवळ चमकोगिरी करण्यावर विश्वास असलेल्या नेत्यांना मात्र दिल्ली दरबारी आपले वजन खर्च करावेसे कधीच वाटत नाही.

कोणत्याही नेत्याच्या प्रयत्नाशिवाय केंद्र शासनाच्या आराखड्यात आल्याने हिंगोली जिल्ह्याच्या रेल्वे स्थानकाचे काम सध्या सुरू आहे. या कामाची केवळ पाहणी करण्याचा देखावा करून चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांनी प्रत्यक्षात रेल्वे मंत्रालय गाठावे व हिंगोली परिसरातील प्रवाशांच्या मागणीचा पाठपुरावा करावा, अशा भावना प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहेत.

दिल्ली दरबारी धडकण्याची एकातही नाही धमक
हिंगोली जिल्ह्याला भारतीय जनता पक्षांनी एक राज्यसभा सदस्य, एक विधान परिषद सदस्य व एक विधान सभेचा आमदार असे तीन नेते दिले आहेत.  जिल्ह्यातील इतर दोन आमदार सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांचे आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेतून निवडून आलेले हिंगोली चे खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या जवळ गेले आहेत. अशी भली मोठी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षांच्या पुढार्‍यांची यादी असताना दिल्ली दरबारी जाऊन धडकण्याची धमक मात्र एकाही नेत्यात नाही.

टैग्स: Hingoli Railway Station

संबंधित सामग्री

हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; अमोल गंगलवाड यांच्या मृत्यूने खळबळ

हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; अमोल गंगलवाड यांच्या मृत्यूने खळबळ

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड (वय ५०) यांच्या आत्महत्येच्या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

Aug 29, 2026
हिंगोलीत नव्या रेल्वे गाडीचे ऐतिहासिक आगमन; नांदेड-कुर्ला एक्सप्रेसचे स्वागत

हिंगोलीत नव्या रेल्वे गाडीचे ऐतिहासिक आगमन; नांदेड-कुर्ला एक्सप्रेसचे स्वागत

Nanded-Kurla Express: नांदेड-कुर्ला या नव्या रेल्वे गाडीचे हिंगोली रेल्वे स्थानकावर प्रथमच आगमन झाले असता, हिंगोलीकरांनी अत्यंत जल्लोषात आणि ऐतिहासिक असे स्वागत, भाजपा नेते खासदार डॉ. रामराव वडकुते

Jul 06, 2026