Police Suicide

हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; अमोल गंगलवाड यांच्या मृत्यूने खळबळ

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड (वय ५०) यांच्या आत्महत्येच्या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; अमोल गंगलवाड यांच्या मृत्यूने खळबळ

Police Suicide

पोलिस नियंत्रण कक्षात होते कार्यरत; दोन महिन्यांपूर्वी परभणीहून हिंगोलीत झाली होती बदली, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

हिंगोली : हिंगोली जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड (वय ५०) यांच्या आत्महत्येच्या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. हिंगोली पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या गंगलवाड यांनी आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास धावत्या रेल्वेसमोर उडी घेत जीवन संपवले. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल गंगलवाड हे पूर्णा येथून अकोलाकडे जाणाऱ्या रेल्वेची प्रतीक्षा करत होते. रेल्वे जवळ येताच त्यांनी तिच्यासमोर उडी घेतली. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती रेल्वेच्या लोकोपायलटने हिंगोली रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांना दिली. त्यानंतर हिंगोली शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच हिंगोलीचे पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून अमोल गंगलवाड यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

अमोल गंगलवाड यांची सुमारे दोन महिन्यांपूर्वी परभणी पोलिस दलातून हिंगोली पोलिस दलात बदली झाली होती. हिंगोलीत रुजू झाल्यानंतर ते पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत होते. मनमिळाऊ स्वभावाचे आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

दरम्यान, त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026