Jalna Road Murder

छत्रपती संभाजीनगर हत्या प्रकरणाचा उलगडा; गोव्यात क्रूझवर वाढदिवस साजरा करण्यासाठी लुटमारीचा कट, दोघे आरोपी जेरबंद

शहरातील व्हीआयपी जालना रोडवर २ जुलैच्या पहाटे झालेल्या भंगार व्यावसायिक अब्दुल बासित हकीम खान यांच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

छत्रपती संभाजीनगर हत्या प्रकरणाचा उलगडा; गोव्यात क्रूझवर वाढदिवस साजरा करण्यासाठी लुटमारीचा कट, दोघे आरोपी जेरबंद

Jalna Road Murder

तंबाखू मागण्याच्या बहाण्याने भंगार व्यावसायिकावर हल्ला; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांची कारवाई, ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील व्हीआयपी जालना रोडवर २ जुलैच्या पहाटे झालेल्या भंगार व्यावसायिक अब्दुल बासित हकीम खान यांच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, टोळीच्या मुख्य सूत्रधाराला गोव्यात आलिशान क्रूझवर वाढदिवस साजरा करण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी शहरात लुटमारीचे प्रकार सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने मुकेश उर्फ मुक्या महेंद्र साळवे (वय २९) आणि विक्की उर्फ सोनू मधुकर पाचवणे (वय २२, दोघे रा. मुकुंदवाडी) यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तंबाखू मागितली, नकार मिळताच हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै रोजी रात्री कामानिमित्त बाहेर पडलेले अब्दुल बासित मध्यरात्री सिडको बसस्थानकावरून रिक्षाने एसएफएस शाळेजवळ उतरले. त्यानंतर ते जिन्सीच्या दिशेने पायी निघाले असताना रात्री सुमारे अडीचच्या सुमारास आकाशवाणी चौकातील पंचम बारसमोर आरोपींनी त्यांना अडवले. त्यांनी प्रथम तंबाखूची मागणी केली. मात्र, "मी कोणतेही व्यसन करत नाही," असे अब्दुल यांनी सांगितल्यानंतर आरोपींनी त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत मुख्य आरोपी मुक्या साळवे याने त्यांच्या मांडीत खोलवर चाकूने वार केला. या हल्ल्यात मुख्य रक्तवाहिनी कापली गेल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हत्या करून घरी जाऊन झोपले; सीसीटीव्हीतून पोलिसांपर्यंत पोहोचले

घटनेनंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुख्य मार्ग टाळत अपेक्स रुग्णालय, चिश्तिया चौक, कॅनॉट प्लेस आणि सिडको ब्रिजमार्गे मुकुंदवाडीतील आपल्या घरी जाऊन विश्रांती घेतली. मात्र, त्यांच्या हालचाली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्या होत्या. फुटेजमधील संशयितांच्या अंगकाठीवरून गुप्त बातमीदाराने मुख्य आरोपी मुक्या साळवेची ओळख पटवली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश ताठे यांच्या संयुक्त पथकाने आरोपींच्या घरावर छापा टाकून दोघांनाही अटक केली.

२५ हून अधिक गुन्ह्यांचा आरोपी; वाढदिवसाच्या आधीच पोलिसांनी पकडले

तपासात असेही समोर आले की, मुख्य आरोपी मुक्या साळवे याच्यावर यापूर्वीच २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा ३ जुलै रोजी वाढदिवस होता आणि तो आपल्या गुन्हेगार मित्रांसह गोव्यात क्रूझवर वाढदिवस साजरा करण्याचा बेत आखत होता. यासाठी आवश्यक निधी उभारण्याच्या उद्देशाने आरोपींनी जालना रोड परिसरात लुटमारीचे प्रकार सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याचा हा बेत उधळून लावला.

या संपूर्ण घटनेनंतर शहर पोलिसांच्या आणि विशेषतः मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेट्रोल पंपाच्या वादातुन चोंडीत खंजीराने एकाची हत्या, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

पेट्रोल पंपाच्या वादातुन चोंडीत खंजीराने एकाची हत्या, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

Petrol pump murder case: वसमत तालुक्यातील चोंडी स्टेशन येथील साई उमेश पेट्रोलपंपावर पेट्रोलपंप चालविण्यावरून झालेल्या वादाचा रक्तरंजित शेवट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली.

Oct 07, 2026
पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026