कावड यात्रा

कावड यात्रेत लाखो शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा अभेद्य बंदोबस्त

Kavad Yatra: शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी काढण्यात येणारी पारंपारिक कावड यात्रा आज सोमवार, २४ ऑगस्ट रोजी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार

कावड यात्रेत लाखो शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा अभेद्य बंदोबस्त

Kavad Yatra

हिंगोली (Kavad Yatra) : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी काढण्यात येणारी पारंपारिक कावड यात्रा आज सोमवार, २४ ऑगस्ट रोजी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली. या यात्रेसाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने सर्वत्र चोख आणि अभेद्य बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे यात्रा निर्विघ्नपणे पार पडली.

दरवर्षी या (Kavad Yatra) कावड यात्रेत लाखो भाविक सहभागी होत असतात. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी विशेष नियोजन केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण हिंगोली शहर आणि यात्रा मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या बंदोबस्तासाठी बंदोबस्त अधिकारी म्हणून अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या सोबत ४ उपविभागीय पोलिस अधिकारी, ११ पोलिस निरीक्षक, २६ सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, ३१४ पोलिस अंमलदार, १ बीडीडीएस पथक, ९५ होमगार्ड जवान आणि राज्य राखीव पोलिस बलाची एक प्लाटून तैनात करण्यात आली होती.

यात्रेच्या एक दिवस आधी म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बंदोबस्त वाटप करण्यात आले आणि रंगीत तालीम घेण्यात आली. प्रत्येक चौक, गर्दीचे ठिकाण आणि मंदिर परिसरात पोलिसांची नजर होती.

आज सकाळपासूनच "बम बम भोले" आणि "हर हर महादेव" च्या जयघोषात शिवभक्तांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले होते. भगव्या ध्वजांनी आणि कावडीने सजलेली ही यात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अखेर हिंगोलीतील ओम कयाधू अमृतेश्वर मंदिरात या यात्रेचा समारोप झाला. पोलिसांच्या शिस्तबद्ध आणि चोख नियोजनामुळे ही कावड यात्रा अत्यंत शांततेत आणि यशस्वीपणे पार पडल्याबद्दल सर्व स्तरातून पोलिस प्रशासनाचे कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

कावड यात्रेमुळेच युवा धर्माच्या मार्गावर: खा. श्रीकांत शिंदे

कावड यात्रेमुळेच युवा धर्माच्या मार्गावर: खा. श्रीकांत शिंदे

Kavad Yatra: देशातील युवा वर्ग संस्कृती पासून दूर जात असल्याच्या तक्रारी होत असताना हिंगोली कळमनुरीत मात्र वेगळेच चित्र पहायला मिळाले. कावड यात्रेमध्ये सहभागी होणार्‍या या युवकांची श्रद्धा व जल्लोष

Aug 24, 2026
कावड यात्रेतील चिमुकल्याला चिरडणाऱ्या ट्रकला जमावाने पेटविले.. 

कावड यात्रेतील चिमुकल्याला चिरडणाऱ्या ट्रकला जमावाने पेटविले.. 

Kavad Yatra Accident: भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने कावड यात्रेत सहभागी  १० वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याने त्याचा जागीच अंत झाला. जळगाव-ममुराबाद रस्त्यावरील म्हाळसादेवी मंदिरा जवळ दुर्दैवी घटना

Aug 24, 2026
कावड यात्रेदरम्यान एका भाविकाचा मृत्यू

कावड यात्रेदरम्यान एका भाविकाचा मृत्यू

Kanwar Yatra Death: विदर्भातील कावड यात्रा श्रीक्षेत्र  औंढा नागनाथाचे दर्शन करून शनिवार  रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोलीकडे येत असताना डिग्रस कर्‍हाळे  पाटीजवळ दोन कावडचे वाहन मागेपुढे..

Aug 23, 2026
उद्या आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वातील कावड यात्रेनिमित्त लाखो शिवभक्तांची मांदीयाळी

उद्या आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वातील कावड यात्रेनिमित्त लाखो शिवभक्तांची मांदीयाळी

Hingoli Kavad Yatra: शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षापासून कळमनुरी ते हिंगोली पर्यत कावड यात्रा काढली जाते. त्या निमित्त २४ ऑगस्टला ही कावड यात्रा

Aug 23, 2026
परभणीत शिवसेनेच्या वतीने ३१ ऑगस्टला परभणीत कावड यात्रा ...!

परभणीत शिवसेनेच्या वतीने ३१ ऑगस्टला परभणीत कावड यात्रा ...!

Parbhani Kavad Yatra: श्रावण महिण्या निमित्त शिवसेनेच्या वतीने ३१ ऑगस्ट रोजी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेसंदर्भात गुरुवार २० ऑगस्ट रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय

Aug 20, 2026