हिंगोली (Hingoli Kavad Yatra) : शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षापासून कळमनुरी ते हिंगोली पर्यत कावड यात्रा काढली जाते. त्या निमित्त २४ ऑगस्टला ही कावड यात्रा काढली जाणार आहे. कावड यात्रेत लाखो शिवभक्तांची मांदियाळी पहावयास मिळणार आहे.
आज २४ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी कळमनुरी शहराजवळील चिंचाळेश्वर महादेव मंदिरात पुजा, अर्चा झाल्यानंतर भव्यदिव्य कावड यात्रेला प्रारंभ होणार आहे. ही कावड यात्रा कळमनुरी शहरातील मुख्यरस्त्यावरून हिंगोलीकडे मार्गक्रमण करणार आहे. हिंगोलीतील नांदेड बायपासवर या कावड यात्रेचे भव्य दिव्य स्वागत केले जाणार आहे. ही यात्रा महाराजा अग्रसेन चौकातून महात्मा गांधी चौैकात सायंकाळी पोहचणार आहे. या ठिकाणी होणार्या कार्यक्रमात संसदरत्न डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आंबीटकर यांच्यासह अनेक खासदार, आमदार व मान्यवर मंडळींची उपस्थिती राहणार आहे.
कावड यात्रेनिमित्ताने (Hingoli Kavad Yatra) कळमनुरी शहरापासून हिंगोली शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी स्वागताचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले आहे. ज्या ज्या मागार्वरून कावड यात्रा मार्गक्रमण करणार त्या त्या ठिकाणी अल्पपोपहार,फळ, पिण्याचे पाणी आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. कावड यात्रेमध्ये रूग्णवाहीका देखील ठेवण्यात आल्या आहेत. भाविकांची कुठेही गैरसोय होऊ नये, या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. कावड यात्रेमध्ये शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.
उद्या आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वातील कावड यात्रेनिमित्त लाखो शिवभक्तांची मांदीयाळी
Hingoli Kavad Yatra: शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षापासून कळमनुरी ते हिंगोली पर्यत कावड यात्रा काढली जाते. त्या निमित्त २४ ऑगस्टला ही कावड यात्रा
Hingoli Kavad Yatra
संबंधित सामग्री
आमदार संतोष बांगर यांच्या मागणीला यश; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार
MLA Santosh Bangar: महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले असताना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी व इतर शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करण्यात
श्री राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान
हिंगोलीतील चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान; लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
हिंगोलीच्या दसर्याचा खंड पडू देऊ नका: आ. संतोष बांगर
MLA Santosh Bangar: श्री सार्वजनिक दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिध्द आहे. म्हैसूरनंतर हिंगोलीच्या दसर्याची ओळख आहे. त्यामुळे यावर्षीच्या दसर्यामध्ये प्रशासनाने खंड पडू देऊ नये
हिंगोलीच्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव विकासासाठी 7 कोटींची मागणी; आ. संतोष बांगर यांचे पालकमंत्री झिरवाळ यांना निवेदन
MLA Santosh Bangar: हिंगोली शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव परिसराच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 मधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार संतोष बांगर
श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; दर्शनासाठी सहा ते सात तास रांगा
हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने शनिवार, रविवार तसेच श्रावण सोमवारी श्री नागनाथाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होत आहे.