कन्हान शहर विकास मंच

संजीवनी नगर परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी

Kanhan Development Forum: कांद्री नगरपंचायत संजीवनी नगर परिसरात विविध समस्या निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिका ऱ्यांनी मुख्याधिकारी सचिन गाढवे आणि नगराध्यक्ष सुजित पानतावणे यांना निवेदन

संजीवनी नगर परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी

Kanhan Development Forum

 

कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

कन्हान (Kanhan Development Forum) : कांद्री नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक १७ मधील संजीवनी नगर परिसरात विविध समस्या निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिका ऱ्यांनी मुख्याधिकारी सचिन गाढवे आणि नगराध्यक्ष सुजित पानतावणे यांना निवेदन देऊन तातडीने समस्या सोडविण्याची मागणी केली आहे .
         
संजीवनी नगर परिसरातील गंगाराम शेंडे यांच्या घरामागे तसेच विनोद कोराते, मनोज बुंदेलिया, अर्चना तांडेकर आणि इतर रहिवाशी यांच्या घरा शेजारी मोठ या प्रमाणात पाणी साचुन राहत आहे. त्यामुळे परिसरा त चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असुन नागरिकां च्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. साच लेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढुन मलेरिया, डेंग्यु, चिकनगुनिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या (Kanhan Development Forum) शिवाय परिसरात डुकरांचा व डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असुन अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्या वर विपरीत परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी झाडे झुडपे वाढल्याने साप, विंचु, अजगर यांसारखे सरपटणारे व विषारी प्राणी रहिवाशांच्या घरांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवि तास गंभीर धोका निर्माण झाला असुन तातडीने उपा ययोजना करणे आवश्यक आहे. तसेच अर्चना तांडेकर , गंगाराम शेंडे व विनोद कोराते यांच्या घराजवळील परिसरात पुरेशा पथदिव्यांची (स्ट्रीट लाईट) व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असुन अनुचित घटनांची शक्य ता वाढली आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू अस ल्याने कांद्री नगरपंचायत मुख्याधिकारी सचिन गाढवे, नगराध्यक्ष सुजित पानतावणे, नगरसेवक राकेश लांजे वार यांनी संजीवनी नगर परिसरातील समस्यांची गांभी र्याने दखल घेऊन परिसरात साचलेल्या पाण्याचा निच रा करणे, स्वच्छता मोहीम राबविणे, झाडेझुडपे हटवि णे, डास व डुकरांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ पथ दिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी महिला सदस्य अर्चना तांडेकर यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी सचिन गाढवे आणि नगराध्यक्ष सुजित पानतावणे यांना निवेदन देऊन केली आहे .  याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक नाराय ण गजभिये, प्रमोद गिऱ्हे, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे, मृणाल सरोजकर,  शुभम बावनकर, आयुष संतापे, मीना गिऱ्हे , जयश्री गडपाडे सह नागरिक उपस्थित होते.

संबंधित सामग्री

राधे नगरातील सांडपाणी व बंद नाल्यांमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीकडे तक्रार

राधे नगरातील सांडपाणी व बंद नाल्यांमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीकडे तक्रार

Shirla Gram Panchayat Wastewater: पातूर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील बंजारा नगर व गहीलोत लेआउट लगत असलेल्या राधे नगर परिसरात साचलेल्या दूषित सांडपाण्यामुळे व बंद पडलेल्या नाल्यांमुळे..

Jun 28, 2026
हिंगोलीत तळणाच्या तेलाचा पुनर्वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; अन्न-औषध प्रशासन आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी

हिंगोलीत तळणाच्या तेलाचा पुनर्वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; अन्न-औषध प्रशासन आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी

Hingoli Oil Violation Action: हिंगोलीत हॉटेल, ढाबे आणि इतर व्यावसायिकांमध्ये तळण्याच्या तेलाचा पुनरापेक्ष सतत वापर करून फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Jun 11, 2026
हिंगोलीत  दूध व अस्वच्छ खाद्यपदार्थांचा सुळसुळाट; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

हिंगोलीत दूध व अस्वच्छ खाद्यपदार्थांचा सुळसुळाट; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

Hingoli milk-food adulterated: हिंगोलीत भेसळयुक्त दूध व खाद्यपदार्थांची नियमित तपासणी कमी असून, अन्नपदार्थ अस्वच्छपण्याचा धोका आहे. मिठाई, मांस, माशांवर घाण यांचा वापरही सुरू

Jun 02, 2026