शिर्ला ग्रामपंचायत दूषित सांडपाणी

राधे नगरातील सांडपाणी व बंद नाल्यांमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीकडे तक्रार

Shirla Gram Panchayat Wastewater: पातूर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील बंजारा नगर व गहीलोत लेआउट लगत असलेल्या राधे नगर परिसरात साचलेल्या दूषित सांडपाण्यामुळे व बंद पडलेल्या नाल्यांमुळे..

राधे नगरातील सांडपाणी व बंद नाल्यांमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीकडे तक्रार

Shirla Gram Panchayat Wastewater

तहसीलदार गटविकास अधिकारी यांचे नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष 

पातूर (Shirla Gram Panchayat Wastewater) : पातूर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील बंजारा नगर व गहीलोत लेआउट लगत असलेल्या राधे नगर परिसरात साचलेल्या दूषित सांडपाण्यामुळे व बंद पडलेल्या नाल्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याबाबत परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती पातुर व तहसीलदार यांना वारंवार निवेदन देण्यात आले. परंतु त्यांनी नागरिकांच्या समस्या कडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची चित्र दिसत असून शनिवारी झालेल्या आत पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. 

तक्रारीनुसार, राधे नगरातील नाल्यांची अनेक दिवसांपासून (Shirla Gram Panchayat Wastewater) साफसफाई न झाल्याने केरकचरा व माती साचून नाले तुंबले आहेत. काही ठिकाणी मोठमोठी झाडेझुडपे वाढल्याने सांडपाण्याचा निचरा होत नसून ते मोकळ्या प्लॉटमध्ये व रस्त्यांवर साचत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून मोठ्या प्रमाणात मच्छर झाल्याने डेंग्यूसह विविध साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांच्या घराजवळील विहिरी व झिरपण क्षेत्रही दूषित होत असल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसाचे पाणी व (Shirla Gram Panchayat Wastewater) सांडपाणी एकत्र येऊन मुख्य रस्त्यावर तुंबण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीलाही अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. शनिवारी पातुर शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या भागा कडे ग्रामपंचायत व गटविकास अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. 

या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन राधे नगरातील दूषित सांडपाण्याची तातडीने विल्हेवाट लावावी, बंद पडलेले नाले साफ करून मोकळे करावेत आणि परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

या भागातील सांडपाण्याचे विल्हेवाटीसाठी नागरिक ग्रामसेवकांना सतत फोन करतात पण ग्रामसेवकांना उडवा उडवी चे उत्तर देताततहसीलदार बीडीओ व ग्रामसेवक यांना निवेदन देऊनही कुठलीच ॲक्शन घेतलेली नाही.
-डॉ. सुदेश पादुने, नागरीक राधे नगर पातूर

संबंधित सामग्री

गौळबाजार मध्ये दूषित पाण्याविरोधात युवकांचे अनोखे आंदोलन

गौळबाजार मध्ये दूषित पाण्याविरोधात युवकांचे अनोखे आंदोलन

Contaminated Water Protest: गौळबाजार येथे सतत दुरुस्ती आणि दुरगंधने नागरिकांना त्रास होण्याच्या समस्या झाल्याने युवकांनी पंचायतीच्या कार्यालयातून दूषित पाणीची मागणी केली.

Jul 14, 2026
संजीवनी नगर परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी

संजीवनी नगर परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी

Kanhan Development Forum: कांद्री नगरपंचायत संजीवनी नगर परिसरात विविध समस्या निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिका ऱ्यांनी मुख्याधिकारी सचिन गाढवे आणि नगराध्यक्ष सुजित पानतावणे यांना निवेदन

Jul 12, 2026
हिंगोलीत तळणाच्या तेलाचा पुनर्वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; अन्न-औषध प्रशासन आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी

हिंगोलीत तळणाच्या तेलाचा पुनर्वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; अन्न-औषध प्रशासन आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी

Hingoli Oil Violation Action: हिंगोलीत हॉटेल, ढाबे आणि इतर व्यावसायिकांमध्ये तळण्याच्या तेलाचा पुनरापेक्ष सतत वापर करून फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Jun 11, 2026
ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांनी मृदा परीक्षणासाठी घेतले मातीचे नमुने

ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांनी मृदा परीक्षणासाठी घेतले मातीचे नमुने

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शेतकरी, गोपालक आणि नागरिकांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.

Jun 11, 2026
हिंगोलीत  दूध व अस्वच्छ खाद्यपदार्थांचा सुळसुळाट; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

हिंगोलीत दूध व अस्वच्छ खाद्यपदार्थांचा सुळसुळाट; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

Hingoli milk-food adulterated: हिंगोलीत भेसळयुक्त दूध व खाद्यपदार्थांची नियमित तपासणी कमी असून, अन्नपदार्थ अस्वच्छपण्याचा धोका आहे. मिठाई, मांस, माशांवर घाण यांचा वापरही सुरू

Jun 02, 2026