कन्हान गुणवंत विद्यार्थी

कन्हानला दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

Kanhan Meritorious student: कन्हान शहर विकास मंच आणि कांद्री मंच संयुक्तपणे दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

कन्हानला दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

कन्हान (Kanhan Meritorious student) : शहर आणि कांद्री शहर विकास मंच यां च्या संयुक्त विद्यमाने जुने कन्हान पोलीस स्टेशनच्या बाजु ला शिवपंचायत हनुमान मंदिर परिसर गांधी चौक येथे दहावी आणि बारावी मध्ये प्राविण्य प्राप्त उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापिका विशाखा ठमके, प्रमुख अतिथि जेष्ठ शिक्षक व संचाल क पी.जी.खेरगडे, संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी दहावी, बारावी मध्ये इंग्रजी आणि मराठी माध्यमात प्रथय, द्वितीय व तृतीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना नोटबुक, पेन देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात मान्यवरांनी उत्तीर्ण विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन करुन अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . या पुढील काळातही आपण सर्व विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करत आपले कन्हान, कांद्री शहराचे, पालकां चे, शिक्षकांचे, शाळा, काॅलेजचे नाव अभिमानाने उंचवाल अशी खात्री मान्यवरांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी आणि आभार प्रदर्शन अर्जुन पात्रे यांनी केले. (Kanhan Meritorious student) कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावन कर, मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिये, ज्ञाने श्वर ऊके, अर्जुन पात्रे, प्रमोद गिऱ्हे, निखिल तांडेकर, सुनिता मानकर, सुषमा मस्के, अर्चना तांडेकर, मीना गिऱ्हे, अविनाश कांबळे, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे, राहुल वानखेडे, रविंद्र कोचे, शुभम बावनकर, सुर्यभान चकोले, मृणाल सरोजकर, आयुष संतापे सह आदि सदस्यांनी परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026