हिंगोली (Private Bus Accident) : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील सागर रिठ्ठे ही तरूणी पोलिस दलाच्या भरती प्रक्रीयेत उत्तीर्ण झाली. त्यामुळे कोल्हापूरला कागदपत्र देण्याकरीता जात असताना खासगी बसचा अपघात झाला. त्यामध्ये ती किरकोळ रित्या जखमी झाली.
मिळालेली माहिती अशी की, पिंपळदरी येथील सागर रिठ्ठे ही कोल्हापूर पोलिस दलामध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या भरती प्रक्रीयेत उत्तीर्ण झाली. कोल्हापूर येथे कागदपत्र देण्या करीता शुक्रवारी ९ मे रोजी जात असताना खासगी बसचा सांगोला गावाजवळ अपघात झाला. यामध्ये सागरच्या छातीला व पायाला मुका मार लागला. तिला तात्काळ सांगोला येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु ९ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत कसे पोहचणार याची चिंता सागरला लागली होती.
तिच्या वडीलांनी ही घटना पिंपळदरी येथील सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांना सांगितली. असता त्यांनी तात्काळ कोल्हापूरचे गृह पोलिस उपाधिक्षक तान्हाजी सावंत यांच्याशी संपर्क साधून सागर रिठ्ठे ही (Private Bus Accident) अपघातात जखमी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर सागर रिठ्ठे हिने तान्हाजी सावंत यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधताच त्यांनी तु फक्त तब्येतेची काळजी घे, कागदपत्र जमा करण्या करीता सोमवारी आली तरी चालेल, कोणताही तान घेऊ नको, असे म्हणताच सागरला मोठा दिलासा मिळाला. तान्हाजी सावंत यांच्या या दिलासादायी शब्दामुळे तिच्या डोळ्यातून आश्रू बाहेर पडले.
खासगी बस अपघातात पिंपळदरी येथील भावी पोलिस महिलेला दुखापत
Private Bus Accident: औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील सागर रिठ्ठे हिला कोल्हापूरला जाताना खासगी बसचा अपघात झाला. तिला तात्काळ सांगोला येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
Private Bus Accident
संबंधित सामग्री
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी
नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ
Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार
Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये
Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.