Diveagar Beach Tragedy

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

Diveagar Beach Tragedy

केळगावचे पोलीस पाटील युवराज वहिले यांचा मुलगा राजवीरही सहलीत; मृत विद्यार्थ्यांच्या यादीत मुलाचे नाव पाहून पोलीस ठाण्यात शोककळा

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील दिवेआगर समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’ या कोचिंग क्लासमधील इयत्ता ११वी आणि १२वी विज्ञान शाखेच्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आळंदी शहरावर शोककळा पसरली आहे.

या घटनेची माहिती आळंदी पोलीस ठाण्यातील बैठकीदरम्यान मिळाली. केळगावचे पोलीस पाटील युवराज वहिले हे त्या वेळी बैठकीसाठी उपस्थित होते. मात्र, दिवेआगर येथे गेलेल्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. कारण त्यांचा मुलगा राजवीर वहिले याचाही या सहलीत समावेश होता.

बैठकीतच आली विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी

आळंदी पोलीस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचारी बैठकीसाठी जमले असताना पोलीस निरीक्षक भीमा नरके यांना फोन आला. आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कऱ्हाडे यांनी फोनवरून दिवेआगर येथे आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांना तातडीने नगर परिषदेत येण्यास सांगण्यात आले.

या घटनेमुळे सुरू असलेली बैठक रद्द करण्यात आली. दरम्यान, ही माहिती ऐकताच युवराज वहिले यांनी आपला मुलगा राजवीरही त्याच सहलीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर काही वेळातच व्हॉट्सअ‍ॅपवर मृत विद्यार्थ्यांची नावे असलेली यादी समोर आली.

या यादीत राजवीर वहिले याचेही नाव असल्याचे समोर आले. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच युवराज वहिले यांना मोठा धक्का बसला. पोलीस ठाण्यात उपस्थित अधिकारी आणि नागरिकही या घटनेने व्यथित झाले.

४८ जणांचा ग्रुप सहलीसाठी रवाना

‘विनर्स अ‍ॅकॅडमी’मधील एकूण ४८ जणांचा ग्रुप रायगड किल्ला आणि दिवेआगर येथे सहलीसाठी आळंदीहून रवाना झाला होता. या पथकात २५ मुले, १७ मुली आणि ६ शिक्षक होते.

दिवसभर विविध ठिकाणी पर्यटन केल्यानंतर विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी पोहोचले. सायंकाळच्या सुमारास काही विद्यार्थी समुद्रात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने काही विद्यार्थी पाण्याच्या जोरदार प्रवाहात ओढले गेले.

या दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मृत विद्यार्थ्यांची नावे

दिवेआगर समुद्रकिनारी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राजवीर वहिले, सोहम भांडवलकर, कौस्तुभ दौंड, यश वानखेडे, कैवल्य वासनकर, तन्मय वहिले, सुमित अहिरे आणि प्रणव बनसोडे यांचा समावेश आहे.

आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे आळंदी तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026