किशोर ज्वेलर्स चोरी

किशोर ज्वेलर्समध्ये चोरी; ७० हजारांचे चांदीचे दागिने लंपास

Kishor Jewelers theft: न्यु गोंडेगाव येथील किशोर ज्वेलर्समध्ये रविवारी पहाटे चांदीच्या सुंदर दागिन्यांचा सुमारे ₹७०,०००चा मुद्देमाल चोरी झाला. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला.

किशोर ज्वेलर्समध्ये चोरी; ७० हजारांचे चांदीचे दागिने लंपास

Kishor Jewelers theft

 

न्यू गोंडेगाव येथील घटना; कन्हान पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

कन्हान (Kishor Jewelers theft) : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू गोंडेगाव येथे असलेल्या किशोर ज्वेलर्स या दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवुन सुमारे ७० हजार रुपये किमतीचे २५० ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली.
             
प्राप्त माहितीनुसार, टेकाडी येथील रहिवासी किशोर सुरेश गुरव (वय ४२) यांचे न्यू गोंडेगाव येथे किशोर ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. शनिवारी (दि. ११) जुलै ला दिवसभर व्यवसाय करून त्यांनी सायंकाळी सुमारे ७ वाजता दुकान बंद करून घरी गेले. रविवारी (दि. १२) जुलै ला पहाटे सुमारे ५.५० वाजता दुकाना शेजारी राहणारे अक्षय आगरे यांनी किशोर यांना दूरध्वनीवरून दुकाना चे शटर फोडुन चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर किशोर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुका नाचे लोखंडी शटर खालच्या बाजुने वाकवलेले दिसता च त्यांनी कन्हान पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीससांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून पाहणी केली असता दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले चांदीचे कानातले, अंगठ्या, तार, पायल तसेच इतर दागिने असा सुमारे २५० ग्रॅम वजन किंमत अंदाजे ७० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

विशेष म्हणजे दुकानातील सोन्याचे दागिने सुरक्षित असुन चोरट्यांनी त्यांना हात लावला नसल्या चे आढळुन आले. प्राथमिक तपासानुसार अज्ञात चोरट्यांनी शनिवार सायंकाळी ७ ते रविवारी पहाटे ५.४५ वाजता दरम्यान दुकानाचे शटर वाकवुन ही चोरी केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी कन्हान पोलीसांनी किशोर गुरव यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पोली स निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्यां चा शोध घेण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

ऑनलाइन गेमिंगच्या नादात तरुण उद्ध्वस्त; ३५ ते ४० लाख गमावले

ऑनलाइन गेमिंगच्या नादात तरुण उद्ध्वस्त; ३५ ते ४० लाख गमावले

ऑनलाइन गेमिंगमध्ये ३५ ते ४० लाख रुपये गमावल्यानंतर तरुणाने नातेवाईकाच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचा आरोप; जेसीबी परस्पर विकल्याचाही दावा.

Sep 18, 2026
चिखली बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचा गोफ लांबवणारा चोरटा जेरबंद; डी.बी. पथकाची बीडमध्ये धाडसी कारवाई

चिखली बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचा गोफ लांबवणारा चोरटा जेरबंद; डी.बी. पथकाची बीडमध्ये धाडसी कारवाई

Chikhli Bus Stand Theft Case: चिखली बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन एका ८० वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ आणि ओम चोरणाऱ्या आरोपीला चिखली पोलिस

Aug 18, 2026
कांद्रीच्या सुखदेव कॉलनीत घरफोडी; चांदी-सोन्यासह ९८ हजारांचा दागिने चोरी

कांद्रीच्या सुखदेव कॉलनीत घरफोडी; चांदी-सोन्यासह ९८ हजारांचा दागिने चोरी

Kandri Burglary Case: कांद्री येथील सुखदेव कॉलनी परिसरातील बंद घराचे कूलुप तोडुन अज्ञात चोरट्याने सुमारे ९८ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघड कीस आली आहे

Aug 10, 2026
चोरीच्या चौथ्या दिवशी गुन्हे शाखेने पकडले चोरट्याला..

चोरीच्या चौथ्या दिवशी गुन्हे शाखेने पकडले चोरट्याला..

Vasmat Theft Crime: शहरात तोतयागिरी करून वृद्ध महिलेच्या अंगावरील भरदिवसा  दागिने लंपास करणार्‍या एका चोरट्याला हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

Aug 09, 2026
परभणीतील सांगळेवाडी येथे घरफोडी; सोन्याच्या दागिण्यासह रोख रक्कम पळविली...!

परभणीतील सांगळेवाडी येथे घरफोडी; सोन्याच्या दागिण्यासह रोख रक्कम पळविली...!

Parbhani burglary case: गंगाखेड तालुक्यातील सांगळेवाडी येथे रविवार रात्री अज्ञात चोरांनी घरफोडी करून घरातील एक लाख रुपयांची रोख व अंदाजे १ लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे चोरी

May 25, 2026