वसमत लंपास चोरी

चोरीच्या चौथ्या दिवशी गुन्हे शाखेने पकडले चोरट्याला..

Vasmat Theft Crime: शहरात तोतयागिरी करून वृद्ध महिलेच्या अंगावरील भरदिवसा  दागिने लंपास करणार्‍या एका चोरट्याला हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

चोरीच्या चौथ्या दिवशी गुन्हे शाखेने पकडले चोरट्याला..

Vasmat Theft Crime

 

तोतया गिरीने वृद्ध महिलेचे दागिने लंपास करणारी वसमत शहरातील घटना

वसमत (Vasmat Theft Crime ) : शहरात तोतयागिरी करून वृद्ध महिलेच्या अंगावरील भरदिवसा  दागिने लंपास करणार्‍या एका चोरट्याला हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. ५ ऑगस्टला वसमत येथील बस स्थानका मागे रस्त्यावर फिर्यादी शांताबाई नामदेव कदम, रा. पारवा ता. वसमत या देवदर्शनाला जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना बनावट सोन्याचे बिस्कीट दाखवले. विश्वासात घेऊन त्यांच्या कानातील ६ ग्रॅम सोन्याचे काड्या व ३० तोळे चांदीचे कडे चोरून नेले.

या (Vasmat Theft Crime) प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकृष्ण लोढा यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. ९ जुलै रोजी आरोपी गणेश सुभाष वाघमारे रा. शिरूर तासबाव ता. अहमदपूर जि. लातूर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्हा व त्याचा एक साथीदार असल्याची कबुली दिली.

आरोपीकडून लंपास केलेले ६ ग्रॅम सोन्याचे काड्या व ३० तोळे चांदीचे कडे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. इतर आरोपीचाही लवकरच शोध लागेल असा विश्वास पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांनी देशोन्नतीशी बोलताना व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील आरोपी वसमतला येऊन महिलेला दिवसाढवळ्या लुटतात या प्रकरणात अन्य कोण्या स्थानिक आरोपीचा हात आहे का याचाही शोध पोलीस घेत आहे.

संबंधित सामग्री

ऑनलाइन गेमिंगच्या नादात तरुण उद्ध्वस्त; ३५ ते ४० लाख गमावले

ऑनलाइन गेमिंगच्या नादात तरुण उद्ध्वस्त; ३५ ते ४० लाख गमावले

ऑनलाइन गेमिंगमध्ये ३५ ते ४० लाख रुपये गमावल्यानंतर तरुणाने नातेवाईकाच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचा आरोप; जेसीबी परस्पर विकल्याचाही दावा.

Sep 18, 2026
रिंग रोडवरील खून प्रकरणात दोघांना अटक; जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

रिंग रोडवरील खून प्रकरणात दोघांना अटक; जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

Latur murder case: बाभळगाव नाक्याकडे जाणाऱ्या रिंग रोडवरील यशोदिप हायड्रोलिक दुकानासमोर झालेल्या मारहाणीत जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या किरण कालिदास सगर याच्या खून प्रकरण

Aug 30, 2026
बिस्कीट व पन्नास रुपयाचे आमिष दाखवून भोळसर मुलीवर सामुहीक अत्याचार

बिस्कीट व पन्नास रुपयाचे आमिष दाखवून भोळसर मुलीवर सामुहीक अत्याचार

Girl Gang-rape: वसमत तालुक्यातील एका गावामध्ये १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेच्या वेडसर पणाचा फायदा घेऊन तिला बिस्किट व पन्नास रुपये देतो असे म्हणुन मोटार सायकलवर बसवून नेऊन तिच्यावर सामुहीक अत्याचार

Aug 20, 2026
औंढा नागनाथ पोलिसांची कामगिरी; अनखळी येथे १ लाख  ४२ हजाराचा गुटखा जप्त

औंढा नागनाथ पोलिसांची कामगिरी; अनखळी येथे १ लाख  ४२ हजाराचा गुटखा जप्त

Aundha Nagnath gutkha seized: औंढा नागनाथ  तालुक्यातील अनखळी येथे पोलिसांनी छापा मारून १ लाख ४२ हजाराचा गुटखा  जप्त केला. या प्रकरणात औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Aug 20, 2026
परभणीत झरी येथे दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले; विद्युत मोटार केबल, शेतमशागतीचे साहित्य चोरी

परभणीत झरी येथे दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले; विद्युत मोटार केबल, शेतमशागतीचे साहित्य चोरी

Parbhani Farm Produce Theft: तालुक्यातील झरी  येथे केबल, मोटार, शेतीसाहित्य चोरी करतांना दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले. इतर चोरटे अ‍ॅटोतून पसार होण्यात यशस्वी झाले.

Aug 20, 2026