पहाटे डोंगराचा भाग कोसळल्याने ३० ते ३५ जण अडकले; NDRF, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे युद्धपातळीवर बचावकार्य, मुंबई-पुणे मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सोमवारी (६ जुलै) पहाटे मुसळधार पावसामुळे भीषण दरड दुर्घटना घडली. पाटण गावात डोंगराचा मोठा भाग कोसळून सुमारे पाच घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. दरड कोसळल्यानंतर ३० ते ३५ नागरिक मातीखाली अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
Pune, Maharashtra: A landslide struck a house in Patan village of Maval taluka early this morning (July 6). According to preliminary information, there is a possibility that the entire family residing in the house is trapped under the debris. The Tehsildar of Maval reached the… pic.twitter.com/wbTWnYDZ4w
— ANI (@ANI) July 6, 2026
मृतांमध्ये नंदू टिकोने (६०), मौली टिकोने (३०) आणि अनिता टिकोने (५५) यांचा समावेश आहे. ही दुर्घटना सोमवारी पहाटे सुमारे ४.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. डोंगराचा मोठा भाग अचानक घसरून घरांवर कोसळल्याने अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले.
Maval, Maharashtra: A landslide struck Patan village in Maval tehsil at around 4 a.m., burying the house of Nandu Tikone under a large amount of debris. Three members of the family were feared trapped. The NDRF launched a rescue operation and recovered one body, while efforts are… pic.twitter.com/UPSVrGNQZ5
— IANS (@ians_india) July 6, 2026
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पोलीस, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. एनडीआरएफच्या जवानांनी ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ठेवले असून, अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक टप्प्यात दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले होते, तर त्यानंतर तिसऱ्या व्यक्तीचाही शोध सुरू ठेवण्यात आला.
लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) गजानन टोम्पे यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील दुर्गम भागात एकूण तीन ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यापैकी एका ठिकाणी घर पूर्णपणे मातीखाली गाडले गेले. दरड कोसळली तेव्हा घरामध्ये तीन जण उपस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली.
#WATCH | Pune, Maharashtra: One death confirmed and 23 people have been rescued in the landslide incident in Patan village of Maval Tahseel of Pune district. Search and rescue operation continues.
— ANI (@ANI) July 6, 2026
(Source: NDRF) pic.twitter.com/aiyIaTPDw2
घटनेची माहिती मिळताच जिल्हा माहिती कार्यालयाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मदत मागवली. त्यानुसार पुणे येथील एनडीआरएफच्या पाचव्या बटालियनमधील ३० सदस्यांचे विशेष पथक तातडीने पाटण गावात दाखल झाले. ढिगारा हटविण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने शोध आणि बचाव मोहीम राबविण्यात येत आहे.
दरम्यान, मावळ तालुक्यातील घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ पाणी साचल्याने एका खासगी बसमधील ३७ प्रवासी अडकून पडले होते. एनडीआरएफच्या पथकाने तातडीने कारवाई करत सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली.
मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. महामार्गावरील दरड हटविल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी एक मार्गिका सुरू करण्यात आली आहे. मात्र, पुणे ते मुंबई मार्गिका अद्यापही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
🚨 Landslide in Pune
— Public News X (@PublicNewsX) July 6, 2026
House buried in Patan village, Maval taluka.
A landslide struck a house early this morning (July 6), with an entire family feared trapped under debris.
Rescue ops underway by local administration and 30-member NDRF team (led by Insp. Ravinder, supervised… pic.twitter.com/8LC5rpdpkO
महामार्ग पोलीस अधीक्षक शिवाजी पवार यांनी सांगितले की, पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक अद्याप बंद असून, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक सुरू करता आलेली नाही. परिस्थितीवर प्रशासनाचे सातत्याने लक्ष असून, हवामान अनुकूल झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.