लातूर बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभापती बावणे यांची माहिती
लातूर (Latur Bazar Samiti) : मागच्या तीन वर्षांत बाजार आवारात विविध विकास कामे राबविण्यात आली. लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अल्पदरात वसतिगृह सुरू करण्यात आले. या वसतिगृहात १४० विद्यार्थी लाभ घेत शिक्षण घेत आहेत. आगामी काळात बाजार समितीच्या वतीने विविध विकासकामे केली जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांनी दिली.
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) सभापती जगदीश बावणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या सर्वसाधारण सभेत सभेपुढील सर्व विषयांना मान्यता देण्यात आली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती सुनील पडिले, संचालक एडवोकेट लक्ष्मण पाटील, ऍडव्होकेट युवराज जाधव, श्रीनिवास शेळके, सुभाष घोडके, तुकाराम गोडसे, बळवंतराव पाटील, प्रा. सचिन सूर्यवंशी, प्रा. डॉ. बालाजी वाघमारे, बालासाहेब बिदादा, सुधीर गोजमगुंडे, शिवाजी कांबळे प्रभारी सचिव अरविंद पाटील, पांडुरंग मुंदडा, चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन सवई आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक अँड. लक्ष्मण पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गणेश रुकमे, दीपक पाटील, विनोद नखाते, राम शिंदे, राजपाल सांडूर, उषा निचळ यांच्यासह बाजार समितीच्या विविध घटकाचे पदाधिकारी, श्रीनिवास बिराजदार, राम बामनकर, दिनकर मोरे, अमोल पवार, तुळशीराम गंभीरे, संजय माने, ज्योतीराम कदम, लखन साबळे, अमोल कांबळे, रज्जाक शेख, राहुल सुरवसे, ज्ञानेश्वर माने आदी उपस्थित होते.