लातूर डॉक्टर आंदोलन

लातूरमध्ये ॲलोपॅथी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

Latur Doctors' Protest: होमिओपॅथी (बीएचएमएस) पदवीधर आणि मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या सरकारच्या विचाराधीन प्रस्तावाला विरोध

लातूरमध्ये ॲलोपॅथी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

Latur Doctors' Protest

 

अत्यावश्यक वैद्यकीय सेवा मात्र सुरू

लातूर (Latur Doctors' Protest) : होमिओपॅथी (बीएचएमएस) पदवीधर आणि मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या सरकारच्या विचाराधीन प्रस्तावाला इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर शाखेने तीव्र विरोध दर्शविला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील ॲलोपॅथी डॉक्टरांनी मंगळवार (दि. ४) रोजी सकाळी ६ वाजल्यापासून बुधवार (दि.५) सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांचे कामबंद आंदोलन केले.

आंदोलनाची सुरुवात महात्मा गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर (Latur Doctors' Protest) डॉक्टरांनी सरकारने हा निर्णय घेऊ नये, अशी मागणी करत आंदोलन केले.टीम आयएमए लातूरच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. केवळ एक वर्षाचा सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना आधुनिक वैद्यकीय परिषदेत नोंदणी देणे हे आधुनिक वैद्यकशास्त्रातील गुणवत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि व्यावसायिक मानकांसाठी घातक ठरेल. आधुनिक वैद्यकशास्त्राचा सखोल अभ्यास न केलेल्या व्यक्तींना अशा प्रकारची परवानगी दिल्यास रुग्णांच्या सुरक्षेवर आणि सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

या विषयावर आयएमएसह विविध वैद्यकीय संघटनांनी यापूर्वी शासन व मंत्रालयाकडे अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि मागण्या केल्या आहेत. मात्र प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची पुरेशी दखल घेतली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.हे आंदोलन रुग्णांच्या विरोधात नसून वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकता, वैज्ञानिक मानदंड आणि रुग्ण सुरक्षा जपण्यासाठी असल्याचे आयएमएने स्पष्ट केले. नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून रुग्णालयांतील तातडीच्या व आपत्कालीन वैद्यकीय सेवा, अतिदक्षता विभाग, प्रसूती सेवा तसेच इतर अत्यावश्यक आरोग्य सेवा पूर्ववत सुरू ठेवण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.

संबंधित सामग्री

इंडियन मेडिकल असोसिएशनचा परवाना नसलेल्या लॅब जवळा बाजारात सुरू

इंडियन मेडिकल असोसिएशनचा परवाना नसलेल्या लॅब जवळा बाजारात सुरू

Indian Medical Association: रक्त तपासणी करणार्‍या आठ मेडिकल लॅब कार्यरत असून बहुतेक जणांकडे इंडियन मेडिकल असोसिएशनचा मान्यताप्राप्त परवाना नसताना रक्त तपासणीचा गोरख धंदा सुरू

Aug 12, 2026
तालुक्यात सुगंधित तंबाखू व दारूची खुलेआम तस्करी; प्रशासन झोपेत की संगनमतात?

तालुक्यात सुगंधित तंबाखू व दारूची खुलेआम तस्करी; प्रशासन झोपेत की संगनमतात?

Korchi liquor Sale: गडचिरोली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग खरोखर कार्यरत आहेत का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Jun 11, 2026