हिंगोली फौजदारी प्रकरण

फौजदारी प्रकरणातील लोकप्रतिनिधींना उठून अभिवादन नको..

Hingoli Criminal Case: राज्य सरकारच्या नवीन सुधारित शुद्धिपत्रकानुसार, फौजदारी प्रकरणातील लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांनी उठून अभिवादन करण्याची गरज नाही.

फौजदारी प्रकरणातील लोकप्रतिनिधींना उठून अभिवादन नको..

Hingoli Criminal Case

 

शासनाचा शुद्धिपत्रकाद्वारे दणका

हिंगोली (Hingoli Criminal Case) : आमदार- खासदार कार्यालयात आले की अधिकाऱ्यांनी उठून उभे राहून सलामी द्यावी हा नियम आता बदलला आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 28 एप्रिल रोजी काढलेल्या सुधारित शुद्धिपत्रकानुसार, फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरलेल्या किंवा चौकशीसाठी बोलावलेल्या लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांनी उठून अभिवादन करण्याची गरज नाही.

पूर्वीच्या 20 नोव्हेंबर 2025 च्या परिपत्रकात आमदार-खासदार भेटायला आल्यावर व परत जाताना अधिकाऱ्यांनी उत्थापन देऊन अभिवादन करावे, असे नमूद होते. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे. नव्या सूचनेनुसार, एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी प्रकरणात (Hingoli Criminal Case) दोषी असेल, अपीलकार किंवा पक्षकार म्हणून चौकशीसाठी आला असेल, किंवा निवडणूक प्रक्रियेसाठी कार्यालयात आला असेल, तर त्याला VIP वागणूक मिळणार नाही. अशा वेळी अधिकाऱ्यांनी त्याला सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच वागणूक द्यावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

सन 2015 ते 2021 दरम्यानच्या सर्व परिपत्रकांचे एकत्रीकरण करून हे सुधारित मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आले आहे. (Hingoli Criminal Case) लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांच्यात भेदभाव होऊ नये, कायदा सर्वांसाठी समान असावा हा यामागचा हेतू असल्याचे शुद्धिपत्रकात म्हटले आहे. हे शुद्धिपत्रक http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने जारी झाले आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार

चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार

Chardham Yatra Record: यंदा केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन

Oct 07, 2026