Maha Aarti

हिंगोलीत १५ ऑगस्टला विश्व हिंदू परिषद-बजरंग दलातर्फे भव्य महाआरती

हिंगोली शहरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘अखंड भारताचा संकल्प’ घेऊन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोलीत १५ ऑगस्टला विश्व हिंदू परिषद-बजरंग दलातर्फे भव्य महाआरती

हिंगोली शहरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘अखंड भारताचा संकल्प’ घेऊन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता गांधी चौकातील धडावाई हनुमान मंदिर येथे पार पडणार आहे.

अखंड भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी या महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मोठ्या संख्येने सनातन हिंदू बांधव उपस्थित राहून दीपप्रज्वलन करून सामूहिक आरतीमध्ये सहभागी होणार आहेत. मंदिर परिसर भगव्या पताका आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात येणार असून, संपूर्ण वातावरण भक्तिमय होणार आहे.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने सर्व सनातन हिंदू बांधवांनी या भव्य महाआरतीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, **‘जय श्रीराम’**च्या घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026