नगरसेवक पद रद्द

रिसोडमध्ये राजकीय भूकंप  तिसऱ्या अपत्यामुळे वानखेडे पती-पत्नीचे नगरसेवक पद रद्द

Corporator Post Abolition: रिसोड नगर परिषदेच्या दोन नगरसेवक-बंडू वानखेडे आणि शितल वानखेडे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तिसरे अपत्यामुळे अपात्र ठरवले गेले

रिसोडमध्ये राजकीय भूकंप  तिसऱ्या अपत्यामुळे वानखेडे पती-पत्नीचे नगरसेवक पद रद्द

Corporator Post Abolition


​जिल्हाधिकाऱ्यांचा वानखेडे दाम्पत्यावर अपात्रतेचा हातोडा

रिसोड (Corporator Post Abolition) : रिसोड नगर परिषदेच्या राजकारणात मंगळवारी एकच खळबळ उडाली. प्रभाग क्रमांक ५-ब मधील नगरसेवक बंडू रामकिसन वानखेडे व प्रभाग क्रमांक १०-अ मधील नगरसेविका शितल बंडू वानखेडे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तिसऱ्या अपत्याच्या कारणावरून अपात्र ठरवले आहे. गोपाल बंडू वानखेडे हे त्यांचे तिसरे अपत्य असल्याचे पुराव्यांवरून सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले.

नगर परिषद निवडणुकीत बंडू वानखेडे यांनी ६१४ मतांनी पवन छित्तरका यांचा, तर शितल वानखेडे यांनी ११२२ मतांनी यशवंत देशमुख यांचा पराभव केला होता. मात्र, महाराष्ट्र नागरी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास संबंधित व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. याच मुद्द्याचा आधार घेत पराभूत उमेदवार पवन छित्तरका आणि यशवंत देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. त्यांनी गोपाल वानखेडे हे तिसरे अपत्य असल्याचे आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे प्रशासनासमोर सादर केले होते.

या (Corporator Post Abolition) प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांची सखोल पडताळणी करण्यात आली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडे दाम्पत्याला दोषी धरत त्यांचे नगरसेवक पद तात्काळ प्रभावाने रद्द केले. विशेष म्हणजे, हे दोन्ही नगरसेवक आमदार अमित झनक यांचे कट्टर समर्थक मानले जातात, त्यामुळे या निर्णयाचा परिणाम स्थानिक राजकारणावरही होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे रिसोडमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आता हे दाम्पत्य या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार का? आणि रिक्त झालेल्या या जागांवर पोटनिवडणूक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

शी जिनपिंग यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका?, उत्तराधिकारी जाहीर केल्यास तख्तापलटाची भीती

शी जिनपिंग यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका?, उत्तराधिकारी जाहीर केल्यास तख्तापलटाची भीती

Chinese President Xi Jinping: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत आणि चीनमधील अंतर्गत सत्तासंघर्षाबाबत खळबळजनक दावा, जिनपिंग यांना गेल्या काही काळात दोन वेळा स्ट्रोक आल्याचा दावा

Sep 06, 2026
लेकीच्या आक्षेपार्ह वक्तव्याने मुख्यमंत्र्यांशी वाद; नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ?

लेकीच्या आक्षेपार्ह वक्तव्याने मुख्यमंत्र्यांशी वाद; नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ?

Konda Sushmita Patel: या वादाची सुरुवात कोंडा सुरेखा यांच्या कन्या कोंडा सुष्मिता पटेल यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. सुष्मिता पटेल यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी...

Sep 04, 2026
त्या घरपोच नोटीसच्या चर्चेला उधाण; उबाठाकडून खासदार संजय देशमुखांना बजावली नोटीस

त्या घरपोच नोटीसच्या चर्चेला उधाण; उबाठाकडून खासदार संजय देशमुखांना बजावली नोटीस

MP Sanjay Deshmukh: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडून शिंदे गटात प्रवेश केलेल्या खा . संजय देशमुख सह अन्य ५ खासदारांच्या बंडखोरी व चिन्ह चोरी मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले

Aug 18, 2026
संजय राऊत विरुद्ध नरेश म्हस्के; सर्वोच्च न्यायालयाबाहेरील व्हिडिओनंतर राजकीय वाद पेटला

संजय राऊत विरुद्ध नरेश म्हस्के; सर्वोच्च न्यायालयाबाहेरील व्हिडिओनंतर राजकीय वाद पेटला

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या अधिकारासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे.

Aug 12, 2026
'प्रसिद्धीसाठी खालच्या पातळीचं राजकारण'; फडणवीसांची काँग्रेसवर टीका

'प्रसिद्धीसाठी खालच्या पातळीचं राजकारण'; फडणवीसांची काँग्रेसवर टीका

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने केलेल्या 'गुंगी गुडिया' या उल्लेखावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

Aug 04, 2026