खासदार संजय देशमुख

त्या घरपोच नोटीसच्या चर्चेला उधाण; उबाठाकडून खासदार संजय देशमुखांना बजावली नोटीस

MP Sanjay Deshmukh: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडून शिंदे गटात प्रवेश केलेल्या खा . संजय देशमुख सह अन्य ५ खासदारांच्या बंडखोरी व चिन्ह चोरी मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले

त्या घरपोच नोटीसच्या चर्चेला उधाण; उबाठाकडून खासदार संजय देशमुखांना बजावली नोटीस

MP Sanjay Deshmukh

सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर ३१ ऑगस्टला सुनावणी; मानोरामध्ये राजकीय खळबळ

मानोरा (MP Sanjay Deshmukh) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडून शिंदे गटात प्रवेश केलेल्या खा . संजय देशमुख यांच्यासह अन्य ५ खासदारांच्या बंडखोरी व चिन्ह चोरी करणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. खा.  देशमुख (MP Sanjay Deshmukh) यांच्या निवासस्थानी पोहचून उबाठाच्या पदाधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आल्याने मानोरा तालुक्यातील राजकीय गोटात चर्चेला उधाण आले आहे. 

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडून शिंदे गटात सहभागी झालेल्या सहा खासदारांविरोधात खासदार अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत बंडखोरी तसेच पक्षचिन्हाच्या मुळालाही आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे.  न्यायालयाच्या नोटीसा खासदार संजय देशमुख यांना मिळाल्या नसल्याचे कारण पुढे येऊ नये, यासाठी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन नोटीस सुपूर्द केली.  

खासदार देशमुख यांच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या चैतन्य धोरे यांनी नोटीस स्वीकारून त्याची पोचपावती दिली. यावेळी खासदार अरविंद सावंत यांचे स्वीय सहाय्यक दीपक गोगल, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे इतर उबाठाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाकडून थेट खासदारांच्या निवासस्थानी नोटीस देण्यात आल्याने आगामी सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. लोकसभा मतदार संघातील मानोरा तालुक्यातील राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत  खासदार संजय देशमुख (MP Sanjay Deshmukh) यांनी आईची शपथ घेऊन पक्ष बदलणार नाही, मी उद्धव साहेब सोबतच राहील. इतरासारखी गद्दारी करणार नाही. असे प्रचार दौऱ्यात भाषणात वक्तव्य केले. परंतु उद्धव साहेबांच्या नावावर जनतेची मते घेऊन निवडून आल्यानंतर २ वर्षातच शिवसेना उबाठाची साथ सोडून गद्दारीचा खरा जो रंग आहे तो दाखविला आणि बेइमानी केली. 
-रविंद्र पवार, उबाठा शिवसेना तालुका प्रमुख, मानोरा

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026