परभणी जिल्हा परिषद

परभणीत जिल्हा परिषदेने शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती निकाल रखडला...!

Parbhani Zilla Parishad: परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शुल्क न भरलेल्या कारणाने शिष्यवृत्ती परिक्षा स्थगित करावी असल्याचे संदेश जिल्हा परिषदने देऊन मागितले आहे.

परभणीत जिल्हा परिषदेने शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती निकाल रखडला...!

Parbhani Zilla Parishad

 

शिक्षण विभागाचा गलथान कारभार परीक्षा परिषदेकडून निकाल राखीव....!

परभणी (Parbhani Zilla Parishad) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचा निकाल जाहीर झाला असला, तरी परभणी जिल्ह्याचा निकाल अद्यापही राखीव ठेवण्यात आला आहे. परीक्षा शुल्काची संपूर्ण रक्कम परीक्षा परिषदेकडे वर्ग न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे.

यंदा शासनाने पूर्वीच्या पद्धतीने शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील १५५ परीक्षा केंद्रांवर एकूण २७ हजार ७४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरण्याचे निश्चित करण्यात आले होते. यासाठी सुरुवातीला २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

मात्र, परीक्षार्थ्यांची संख्या वाढल्याने एकूण ३३.४३ लाख रुपयांची गरज लागली. त्यामुळे उर्वरित ८.४३ लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीसाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यात आली. मात्र, या मंजुरीची अनुपालन प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने परीक्षा परिषदेकडे संपूर्ण शुल्क वर्ग करता आले नाही. शुल्क न भरल्याने परभणी जिल्ह्यातील हजारो जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने अनुपालनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, थकीत परीक्षा शुल्क परीक्षा परिषदेकडे वर्ग करावे आणि परभणी जिल्ह्याचा शिष्यवृत्ती निकाल त्वरित जाहीर करावा, अशी मागणी पालक, विद्यार्थी यांच्याकडून होत आहे.

निकाल लवकरच जाहीर होईल
याबाबत शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांना विचारले असता येत्या काही दिवसांत शुल्क भरण्यात येणार आहे. पत्र दिल्यावर निकाल जाहीर करण्याचे परीक्षा परिषदेने मान्य केले आहे. उद्या तसे पत्र  देऊन जिल्ह्याचा निकाल जाहीर करण्याची विनंती केली जाणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर होईल. - शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे.

संबंधित सामग्री

परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

Parbhani Financial Fraud: लेखा व कोषागार कार्यालयातून चार वेळा अधिकची घेतलेली एरीयसची रक्कम वेग वेगळया तारखेला कनिष्ठ लिपीकाने व्ययक्तीक खात्यावर घेऊन आर्थिक लाभ मिळवत शासनाची फसवणुक

Aug 13, 2026
'त्या' प्रकरणी दोन डॉक्टरांसह दोन चालकांचे निलंबन

'त्या' प्रकरणी दोन डॉक्टरांसह दोन चालकांचे निलंबन

Pregnant woman's death case: जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली

Aug 11, 2026
परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

Parbhani Urea Black Marketing: युरिया खताची मागणी जास्त असल्याचा गैरफायदा घेत होलसेल व्यापारी लहान विक्रेत्यांना व शेतकर्‍यांना युरियासोबत इतर महागडी खते घेण्याची सक्ती करत आहेत.

Aug 07, 2026
परभणीत एसआयआर मोहिमेत गंगाखेड विधानसभा जिल्ह्यासह मराठवाड्यात अव्वल...!

परभणीत एसआयआर मोहिमेत गंगाखेड विधानसभा जिल्ह्यासह मराठवाड्यात अव्वल...!

Gangakhed SIR Campaign: गंगाखेड तालुक्यात निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर कार्यक्रम) मोहिमेत गंगाखेड विधानसभा मतदार संघ..

Aug 05, 2026
पीडीसी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद कदम बोर्डीकर आणि उपाध्यक्षपदी भैय्या पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड

पीडीसी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद कदम बोर्डीकर आणि उपाध्यक्षपदी भैय्या पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड

PDC Bank: सहकारी बँकेतच्या उपाध्यक्षपदी गेल्या भव्यांवर नाविने अच्याः रामप्रसाद कदम आणि उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा पाटील राझेश यांची बिनविरोध निवड झाली.

Aug 03, 2026