पातूर धोदानी धबधबा

धोदानी धबधब्यावर अंघोळीस बंदी घाला; सुरक्षा व्यवस्था वाढवा: फरहान अमीन 

Patur Dhodani Waterfall: पातूर तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आलेल्या धोदानी धबधब्यावर वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ कठोर सुरक्षा उपाययोजना

धोदानी धबधब्यावर अंघोळीस बंदी घाला; सुरक्षा व्यवस्था वाढवा: फरहान अमीन 

Patur Dhodani Waterfall

 

काल अकोल्यातील युवकाचा बुडून मृत्यू; प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

पातूर (Patur Dhodani Waterfall) : पातूर तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आलेल्या धोदानी धबधब्यावर वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ कठोर सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव मो. फरहान अमीन यांनी केली आहे.

पावसाळ्यामुळे धोदानी धबधब्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, वाढलेला पाण्याचा प्रवाह, निसरडे दगड, पर्यटकांची गर्दी आणि काही पर्यटकांकडून मद्यप्राशन करून पाण्यात उतरण्याचे प्रकार यामुळे येथे जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कालच धोदानी धबधब्यावर अकोला येथील एका युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने धबधबा परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर फरहान अमीन यांनी पातूर तहसीलदार यांना निवेदन देऊन धोदानी धबधब्यावर अंघोळ व पोहण्यास तात्काळ बंदी, शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी पोलीस बंदोबस्त, धोक्याचे सूचना फलक, मद्यप्राशन करणाऱ्यांवर कठोर कारवाई तसेच कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

“धोदानी धबधबा (Patur Dhodani Waterfall) पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावा; मात्र तो पर्यटकांसाठी मृत्यूचा सापळा ठरू नये. नागरिकांच्या जीविताशी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही न केल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे फरहान अमीन यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नातीक शेख , सैय्यद फैझान आदी उपस्थित होते.


“काल एका युवकाचा जीव गेला आहे. आता आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? दुर्घटना घडल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा दुर्घटना घडूच नये यासाठी प्रशासनाने आजच ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे,”
- मो. फरहान अमीन, प्रदेश सचिव:राष्ट्रवादी विध्यार्थी कांग्रेस, महाराष्ट्र

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026