SC/ST अत्याचार प्रकरण

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत पात्र प्रकरणांना मान्यता

SC/ST Atrocities Case: जिल्हा दक्षता समितीने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत दाखल प्रकरणांना मान्यता दिली. प्रकरणांची वेळेत निकालीसाठी निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत पात्र प्रकरणांना मान्यता

SC/ST Atrocities Case

हिंगोली (SC/ST Atrocities Case) : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल प्रथम खबर अहवाल, दोषारोप पत्र, पेन्शन मंजुरी, वारसांना नोकरी आदी विषयांवरील प्रकरणांचा आढावा घेऊन पात्र प्रकरणांना समितीने मान्यता दिली. तसेच संबंधित प्रकरणे वेळेत निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीस समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त अमोल घुगे, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत विविध प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रथम खबर अहवाल, दोषारोप पत्र, पीडितांना आर्थिक सहाय्य, पेन्शन मंजुरी तसेच वारसांना नोकरी देण्यासंदर्भातील प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. पात्र ठरलेल्या प्रकरणांना समितीने मान्यता दिली. तसेच प्रकरणांच्या निकाली प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर पात्र, अपात्रतेची कार्यवाही करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, सर्व तहसीलदार, सर्व तालुका कृषी अधिकारी, समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित प्रस्तावांमध्ये असलेल्या त्रुटींची पूर्तता करून पात्र व अपात्रतेबाबत कार्यवाहीसाठी परिपूर्ण प्रस्ताव पुढील आठवड्यात समितीसमोर सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

संबंधित सामग्री

मोठा निर्णय! आता तृतीयपंथीयांना मिळणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मोठा निर्णय! आता तृतीयपंथीयांना मिळणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Transgender Education Scholarship: तृतीयपंथीयांना शिष्यवृत्ती तसेच स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृ‍तिक ‍विकास घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार

Sep 10, 2026
हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा डंका! डायल 112 सेवेत राज्यात प्रथम क्रमांक

हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा डंका! डायल 112 सेवेत राज्यात प्रथम क्रमांक

Hingoli Dial 112 Service: संकटात सापडलेल्या नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्यात हिंगोली जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण महाराष्ट्रात बाजी मारली आहे. डायल ११२ या आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली

Sep 01, 2026
परभणीत विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीची शिक्षा कायम..!

परभणीत विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीची शिक्षा कायम..!

Parbhani molestation case: गंगाखेड येथे शेतातून घराकडे परतणाऱ्या विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी पालम येथील कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवल्याचा निकाल गंगाखेड अप्पर जिल्हा..

Aug 14, 2026
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून तीन दिवसीय सामाजिक व धार्मिक उपक्रम

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून तीन दिवसीय सामाजिक व धार्मिक उपक्रम

Shiv Sena Uddhav Thackeray: तीन दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण, महाआरती, धार्मिक स्थळांवर पूजा-अर्चा, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

Jul 27, 2026
अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात लातुरात उद्या महामोर्चा; ५८ जाती समूहांचा सहभाग, आनंदराज आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात लातुरात उद्या महामोर्चा; ५८ जाती समूहांचा सहभाग, आनंदराज आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ, ब, क, ड अशा स्वरूपाचे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Jul 04, 2026