शिवसेना उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून तीन दिवसीय सामाजिक व धार्मिक उपक्रम

Shiv Sena Uddhav Thackeray: तीन दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण, महाआरती, धार्मिक स्थळांवर पूजा-अर्चा, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून तीन दिवसीय सामाजिक व धार्मिक उपक्रम

Shiv Sena Uddhav Thackeray

 

वृक्षारोपण, महाआरती, रुग्णांना फळवाटप; शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग

चिखली (Shiv Sena Uddhav Thackeray) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, यासाठी शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरुभाऊ खेडेकर यांच्या उपस्थितीत चिखली तालुक्यात शिवसेनेच्या वतीने तीन दिवसीय विविध सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या तीन दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण, महाआरती, धार्मिक स्थळांवर पूजा-अर्चा, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या उपक्रमांना शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शनिवार, २५ जुलै रोजी या तीन दिवसीय सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. सकाळी ९ वाजता रानअंत्री येथील श्री गुरु परमानंद नारायण सरस्वती महाराज संस्थान येथे महाआरती करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि त्यांना दीर्घायुष्य मिळावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर रानअंत्री येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

रविवार, २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता इसोली येथे अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या ठिकाणी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यानंतर सकाळी १० वाजता अमडापूर येथील बल्लाळ देवी संस्थान येथे महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी देवीचे दर्शन घेत उद्धव ठाकरे यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर सकाळी ११ वाजता सिंदिहराळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

सोमवार, २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. त्यानंतर सकाळी ११ वाजता आई रेणुका माता मंदिरात पातळ अर्पण करून महाआरती करण्यात आली. धार्मिक परंपरेनुसार विधीवत पूजा-अर्चा करून उद्धव ठाकरे यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर खैरूशा बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवून सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला.

तीन दिवसीय उपक्रमाच्या समारोपप्रसंगी दुपारी १२ वाजता सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यात आली. यावेळी रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसाचा उत्सव केवळ औपचारिक पद्धतीने न साजरा करता सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

या कार्यक्रमांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलासराव सुरडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान भाऊ सुपेकर, शिवसेना तालुकाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किसन धोंडगे पाटील, शिवसेना शहरप्रमुख श्रीराम झोरे, तालुका संघटक विष्णू मुरकुटे, विधानसभा संघटक अरुण खडके, ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर भाऊ शिंदे, दिलीपराव वानखेडे, सखाराम पाटील भुतेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, युवासेना तालुकाप्रमुख गजानन पवार, किसान सेना जिल्हाप्रमुख वसंतराव झाल्टे, तालुका समन्वयक बी. टी. म्हस्के, किसान सेना उपजिल्हाप्रमुख अरुण आंबसकर, ज्येष्ठ शिवसैनिक अशोकराव भोसले, अंबादास शिंदे, अनंता काकडे, उपतालुकाप्रमुख कौतिकराव जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मनोज भुतेकर, उपतालुकाप्रमुख सुनील रगड, किसान सेना तालुकाप्रमुख नारायण वाणी, उपतालुकाप्रमुख वसंतराव अंभोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

तसेच उत्तमराव भुतेकर, माजी सरपंच विजयसिंह सोळंकी, देविदास भाऊ लोखंडे, मधुकर आंभोरे, सुभाष सोनुने, छगन वानखेडे, मालोजीराव गुजर, विभागप्रमुख रामभाऊ चिंचोले, गजानन वायाळ, विजय लोखंडे, मदन आकाळ, गजानन तायडे, किशोर हाडे, सिद्धू सिंग इंगळे, ज्ञानदेव सुरडकर, खुशालराव पडघान, नारायण सुरडकर, राहुल मिसाळ, संदीप वायाळ, मधुकर वायाळ, अण्णाभाऊ देवकर, बंडूभाऊ सरसे, संतोष रिंढे, दत्ता काकडे, हरिभाऊ धूड, काशिनाथ खेडेकर, दिलीप परिहार, नंदकुमार झाल्टे, रघुवीर वाघ, जगु महाराज घुबे, राजेंद्र घुबे, बंटी कपूर, रामदास पडघान, प्रताप पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय उपक्रमातून सामाजिक सेवा, पर्यावरण संवर्धन, धार्मिक श्रद्धा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला. विविध समाजोपयोगी उपक्रमांमधून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026