शिक्षक ऑनलाईन काम

शिक्षकांवर ऑनलाईन कामाचा वाढता ताण; वैयक्तिक मोबाईल वापरास सक्तीविरोधात शिक्षक समिती आक्रमक

Teachers work online: महाराष्ट्रातील शिक्षकांवर वैयक्तिक मोबाईलचा सक्तीने वापर करण्याच्या आदेशामुळे तीव्र नाराजी. शिक्षक समितीने आंदोलनाचा इशारा दिला.

शिक्षकांवर ऑनलाईन कामाचा वाढता ताण; वैयक्तिक मोबाईल वापरास सक्तीविरोधात शिक्षक समिती आक्रमक

Teachers work online

“मोबाईल माझा, डेटा माझा-शासनाचा त्यात वाटा नाही”

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा इशारा

अमरावती (Teachers work online) : राज्यातील शिक्षकांवर दिवसेंदिवस ऑनलाईन कामाचा ताण वाढत असून, यासाठी वैयक्तिक मोबाईलचा सक्तीने वापर करावा लागत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या संदर्भात शासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. वरीष्ट अधिकारी एसीत बसुन नवनविन उपक्रम राबवत आहे.याचा ञास मुख्याध्यापक,शिक्षक यांना होत आहे.

निपुण चाचणीपासून सुरू झालेली मोबाईल वापराची सक्ती आता ‘स्कॉफ’ (SCAF) माहिती भरण्यापर्यंत वाढली असून, प्रत्येक शिक्षकाला स्वतःच्या मोबाईलमध्ये विविध ॲप डाउनलोड करून त्यावर काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रक्रियेत गुगल ड्राईव्हवर फोटो अपलोड करणे, त्याच्या लिंक तयार करून ॲपमध्ये पेस्ट करणे, तसेच 128 प्रकारच्या प्रश्नांची माहिती व संबंधित कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करणे अशी अनेक अतिरिक्त कामे शिक्षकांवर टाकण्यात आली आहेत.

शिक्षकांनी व्यक्त केलेल्या नाराजीनुसार, वैयक्तिक मोबाईलमध्ये बँकिंग, कौटुंबिक माहिती व खाजगी डेटा साठवलेला असतो. अशा परिस्थितीत शासनाच्या विविध ॲप्सचा वापर करण्याची सक्ती ही गोपनीयतेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. तसेच, ऑनलाईन कामासाठी लागणारा डेटा खर्च, साधनसामुग्री व तांत्रिक सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जात नसल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

याबाबत राज्य नेते उदय शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर,  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, “ऑनलाईन कामासाठी आवश्यक सुविधा व साधने उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. शिक्षकांच्या वैयक्तिक मोबाईलवर सक्ती करणे अन्यायकारक असून, ही दादागिरी यापुढे सहन केली जाणार नाही.” तसेच, शाळा स्तरावर उपलब्ध असलेले पुरावे प्रत्यक्ष तपासणीद्वारे पडताळता येऊ शकतात, असे असताना सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यामागील उद्देश काय, असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे.

शिक्षक समितीने शासनाकडे मागणी केली आहे की, (Teachers work online) ऑनलाईन कामासाठी स्वतंत्र यंत्रणा, अधिकृत साधने व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा, या सक्तीविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राज्य शाखेकडून देण्यात आला असल्याचे राज्य प्रसिध्दीप्रमुख राजेश सावरकर यांनी सांगितले आहे.

संबंधित सामग्री

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

Kurunda Farmers' Protest: भारतीय स्टेट बँक  शाखेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, सातत्याने होणाऱ्या पिळवणूक व हेळसांडीला कंटाळून ७ ऑक्टोबर बुधवार रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखा.

Oct 07, 2026
पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026