पालकमंत्री अतुल सावे

श्रीक्षेत्र माहूरगड येथे विकासकामांना गती; भाविकांसाठी दर्जेदार सुविधांवर भर: पालकमंत्री अतुल सावे

Atul Save: नांदेडमधील माहूरगड येथे विकासकामांना गती देण्याच्या सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी दिल्या. यामध्ये 829.13 कोटी रुपयांच्या विकासकामांचा समावेश

श्रीक्षेत्र माहूरगड येथे विकासकामांना गती; भाविकांसाठी दर्जेदार सुविधांवर भर: पालकमंत्री अतुल सावे

Atul Save

विविध विकास कामांची केली पाहणी व घेतला आढावा

नांदेड (Atul Save) : श्रीक्षेत्र माहूरगड येथे सुरू असलेल्या विकासकामांमधून भाविकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयातून नियोजनबद्ध कामे पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी दिले.

आज माहूर येथे श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखड्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपवनसंरक्षक मनीषा पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनीतचंद्र दोन्तुला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

माहूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे भाविकांना सोयीस्कर, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विकासकामांना गती देण्याच्या सूचना पालकमंत्री अतुल  सावे यांनी दिल्या. तसेच या पवित्र स्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असून अडचणी तात्काळ सोडविल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पालकमंत्री सावे (Atul Save) यांनी श्री रेणुका देवी मंदिर परिसर, मातृतीर्थ कुंड, पर्यटक सुविधा केंद्र, वाहनतळ तसेच इतर पायाभूत सुविधांच्या पहिल्या टप्प्यातील कामांचा सविस्तर आढावा घेतला. यासोबतच दुसऱ्या टप्प्यातील श्री दत्त मंदिर व शिखर परिसर, श्री अनुसया देवी मंदिर, कैलास टेकडी, श्री महादेव मंदिर, वनदेव मंदिर, कपिलेश्वर मंदिर, विविध दर्गे, बौद्ध विहार, जमदग्नी कृषी मंदिर, गणपती मंदिर परिसर तसेच पोचमार्ग विकास, वन विभाग व पुरातत्व विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. एकूण सुमारे 829.13 कोटी रुपयांच्या विकासकामांचा यामध्ये समावेश आहे.

यापूर्वी पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले तसेच श्री दत्तशिखर संस्थानास भेट देऊन महंत धनेश्वर भारती (योगी श्याम भारती महाराज) यांची भेट घेतली. तसेच परमपूज्य मधुसुदनजी भारती महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले.

दरम्यान, बैठकीत आदिवासी विभागाच्या विविध योजनांचाही आढावा घेण्यात आला. किनवट येथील रेल्वे उड्डाणपूल प्रस्ताव, वीजपुरवठा समस्या, कापूस जिनिंग युनिट विस्तार, प्राथमिक आरोग्य केंद्रांची प्रगती, गोदाम उभारणी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

संबंधित सामग्री

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

Nanded Aadhar card: गत पंधरा वर्षांपासून आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासह दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडचणींचा सामना करणाऱ्या संजय डोमाजी दालपे यांना नितीन हातमोडे, सेतू केंद्र..

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026