मानोरा तालुका दुष्काळग्रस्त

विधिमंडळ अवलोकन समितीकडे मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी

Manora Taluka Drought: डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या शिक्षण, सिंचन व आरोग्यासह मूलभूत सुविधापासून वंचित असलेल्या राज्यातील अती मागास आकांक्षीत तालुका म्हणून राज्यात गणना होणाऱ्या मानोरा

विधिमंडळ अवलोकन समितीकडे मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी

Manora Taluka Drought

 

शेतकरी नेते मनोहर राठोड यांची मंत्री नाईक व सदाभाऊ खोत यांच्याकडे पाठपुरावा

मानोरा (Manora Taluka Drought) : डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या शिक्षण, सिंचन व आरोग्यासह मूलभूत सुविधापासून वंचित असलेल्या राज्यातील अती मागास आकांक्षीत तालुका म्हणून राज्यात गणना होणाऱ्या मानोरा तालुक्याला शासनाने दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषीत करावे, अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेचे नेते मनोहर राठोड यांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि विधिमंडळ अवलोकन अंदाज समितीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी चर्चा करत निवेदन सादर करून केली आहे. 

तालुक्यातील कारखेडा - वरोली, गलमगाव - चिखली - धानोरा व देवठाणा - कारपा या गावातील रस्त्याची दयनीय अवस्था असून या रस्त्याने रोज अपघात होतात. ही मरण यातना पावलोपावली तालुक्यातील जनता भोगत असतानाच; यावर्षी पावसांच्या खंडामुळे (Manora Taluka Drought) कोरडया दुष्काळाची झळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांचा  शासनाने नुकतीच जाहीर केलेल्या कोरड्या दुष्काळाच्या यादीत मानोरा तालुक्याचा समावेश न केल्यामुळे भ्रमनिराश झाली आहे. त्यामुळे विधिमंडळाची अवलोकन अंदाज समिती पुसद दौऱ्यावर असताना परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी समितीच्या सदस्यांची पुसद येथील नाईक बंगल्यावर ना. नाईक आणि आ. खोत यांची भेट घेऊन तालुक्याची व्यथा मांडत तालुक्याला कोरड्या दुष्काळात (Manora Taluka Drought) समाविष्ट करण्याची मागणी करत तालुक्याच्या व्यथा विशद केल्या.

यावेळी मागील वर्षाचा पिक विमासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विविध उपाययोजनाची तरतूद करून आमच्या समस्यांची कायमस्वरूपी सोडवणूक करून न्याय देण्याची मागणी या समीतीकडे  केली आहे. विधिमंडळ अवलोकन अंदाज समिती तीन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर असून पुसदच्या दौऱ्यामध्ये या समितीतील विधिमंडळ सदस्यांना पुसदच्या नाईक  बंगल्यावर गाठून शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी ना. नाईक आणि समिती प्रमुख सदाभाऊ खोत सह विधानपरिषद आमदार यांना चालू खरीप हंगामातील पावसाच्या खंडामुळे उभी पिके करपलीत.

 प्रत्यक्ष शेत पातळीवरील पीक नुकसान गृहीत धरून पिक विमा योजनेचा जोखीम सह गतवर्षीचा रखडलेला पिक विमा देखील देण्यात यावा शासनाच्या लोकाभिमुख योजनेतील प्रशासनाकडून होणारी दिरंगाई  विकासात्मक कामे रस्ते, वीज, पाणी,आरोग्य,शिक्षण व सिंचनाच्या मूलभूत समस्यामुळे मानोरा तालुका हा विकासाने भरकटलेला असून अविकसित व अकांक्षीत आमच्या माथी मारलेला कलंक कधी पुसला जाईल असा केविलवाना प्रश्नही आमदार खोत यांच्याकडे मनोहर राठोड यांनी केला. कोरड्या दुष्काळासाठी मागील दोन आठवड्यापासून प्रशासनाकडे निवेदन देऊन दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत मानोरा तालुक्याचा समावेश करण्याची मागणी लावून धरत पोळ्याच्या दिवशी तहसील कचेरीवर पोळा भरवीत शेतकऱ्याचा आक्रोश प्रशासनाकडे व्यक्त केल्याचेही त्यांनी विशद केल्याची माहिती दिली.

टैग्स: Manora Taluka Drought

संबंधित सामग्री

मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; उद्या तहसीलवर बैलासह पोळा मोर्चा धडकणार

मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; उद्या तहसीलवर बैलासह पोळा मोर्चा धडकणार

Manora Taluka Drought: गेल्या अनेक दिवसांपासून मानोरा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद यासह सर्वच पिके करपून गेली आहेत.

Sep 09, 2026
मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी १६ सप्टेंबरला जन आक्रोश आंदोलन

मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी १६ सप्टेंबरला जन आक्रोश आंदोलन

Manora Taluka Drought: मानोरा तालुक्यात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने शेतकऱ्यांवर कोरड्या दुष्काळाचे संकट ओढावले आहे. पिके करपून गेली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

Sep 09, 2026