मानोरा तालुका दुष्काळ

मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; उद्या तहसीलवर बैलासह पोळा मोर्चा धडकणार

Manora Taluka Drought: गेल्या अनेक दिवसांपासून मानोरा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद यासह सर्वच पिके करपून गेली आहेत.

मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; उद्या तहसीलवर बैलासह पोळा मोर्चा धडकणार

Manora Taluka Drought

 

परिवर्तन शेतकरी संघटनेचा एल्गार

मानोरा (Manora Taluka Drought) : गेल्या अनेक दिवसांपासून मानोरा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद यासह सर्वच पिके करपून गेली आहेत. शासनाकडे वारंवार निवेदन देऊनही मानोरा तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता आज दि. १० सप्टेंबर रोजी थेट तहसीलवर धडक देत सकाळी ११ वाजता  परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात पोळा भरविण्यात येणार आहे. 
   
या (Manora Taluka Drought) मोर्चाचे नेतृत्व परिवर्तन शेतकरी संघटनेचे प्रवर्तक मनोहर राठोड करणार असून, या मोर्चाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून  विदर्भ प्रमुख राजू नाईक, गोरसेनेचे तालुका अध्यक्ष सुनील राठोड, शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर, राष्ट्रीय प्रबोधनकार पंकजपाल महाराज, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनीष जाधव, शेतकरी नेते डॉ. विठ्ठल घाडगे, तांडा सुधार समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश राठोड, शेतकरी चळवळीचे नेते विशाल ठाकरे, प्रमोद महाले, किशोर नाईक, धनराज राठोड,  गोपीचंद चव्हाण, विवेक आडे , गजानन डोलारकर, धर्मानंद भगत, नंदू वाडे, संतोष ढोके, अनिल राठोड, ज्ञानेश्वर पवार, नंदू पारधी  यांची उपस्थिती राहणार आहे.

मागील आठ ते दहा दिवसांपासून स्थानिक जिल्हाधिकारी, कृषीमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊनही मानोरा तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्यात आला नाही. संपूर्ण तालुका दुष्काळाच्या छायेत असून शेतातील घास हिरावला गेल्याने शेतकरी दुबार पेरणी करून हातातोंडाशी आलेला घास गेल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. मागील पीक विम्याचे व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मंजूर झालेले ३२.५०० रुपयांचे अनुदान अद्याप मिळाले नाही.

मानोरा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त (Manora Taluka Drought) जाहीर करून हेक्टरी १ लाख रुपये मदत जाहीर करा, कृषी पंपाचे भारनियमन तात्काळ बंद करा, पीक विम्याचे अनुदान तात्काळ मंजूर करा, बळीराजाला दिलासा देण्यासाठी तात्पुरती सरसकट कर्जमाफी व नवीन पीक कर्ज वाटप तात्काळ सुरू करा आदी मागण्यासाठी पोळा तहसील कचेरीवर भरविण्यात येणार आहे.  तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या बैलजोडीसह व मोठ्या संख्येने या पोळा मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टैग्स: Manora Taluka Drought

संबंधित सामग्री

विधिमंडळ अवलोकन समितीकडे मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी

विधिमंडळ अवलोकन समितीकडे मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी

Manora Taluka Drought: डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या शिक्षण, सिंचन व आरोग्यासह मूलभूत सुविधापासून वंचित असलेल्या राज्यातील अती मागास आकांक्षीत तालुका म्हणून राज्यात गणना होणाऱ्या मानोरा

Sep 14, 2026
मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी १६ सप्टेंबरला जन आक्रोश आंदोलन

मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी १६ सप्टेंबरला जन आक्रोश आंदोलन

Manora Taluka Drought: मानोरा तालुक्यात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने शेतकऱ्यांवर कोरड्या दुष्काळाचे संकट ओढावले आहे. पिके करपून गेली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

Sep 09, 2026