इंधन संकट

पेट्रोल पंपावर नागरिकांची तुफान गर्दी; वाहनांच्या लागल्या रांगाच रांगा!

Petrol Crisis: मानोरा तालुक्यात इंधनाच्या तुटवड्याची अफवा पसरल्याने नागरिक संभ्रमात; पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, नागरिकांमध्ये नाराजी.

पेट्रोल पंपावर नागरिकांची तुफान गर्दी; वाहनांच्या लागल्या रांगाच रांगा!

Petrol Crisis

मानोरा (Petrol Crisis) : काही दिवसापासून आखाती देशामध्ये युद्ध सुरू असता त्याची झळ आता मानोरा तालुक्यातही हल्ली प्रकर्षाने नागरिकांना जाणवायला सुरुवात झाली आहे. पेट्रोल व गॅस इंधनाचा तुटवडा निर्माण होऊन ती मिळणार नाही अशी अफवा पसरल्याने शहरासह तालुक्यातील बहुतांश पेट्रोल डिझेलचा स्टॉक असलेल्या सर्वच पेट्रोल पंपावर नागरिक एकच गर्दी करीत आहे. 

पेट्रोल पंपावर (Petrol Crisis) दुचाकी आणि चार चाकी लांबच लांब रांगा लागल्या असुन इंधन मिळविण्यासाठी त्यांच्यात चढाओढ पाहायला मिळत आहे. तालुक्यात इंधन तुटवड्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि मानोरा शहरातील प्रत्येक पेट्रोल पंप गर्दीने ओसंडून वाहू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. जे वाहनधारक शे दोनशेचे रुपयाचे पेट्रोल भरायचे ते आज टाकी फुल करत असल्याचे बघायला मिळत आहे. हीच स्थिती चारचाकी वाहन धारकांची आहे.

एका अफेमुळे लोकात किती संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले याचा प्रत्यक्ष पुरावा प्रत्येक (Petrol Crisis) पेट्रोल पंपावर दिसून येत आहे. इंधनाची खरंच कमतरता आहे का ? की ही केवळ अफवा आहे. याचा खुलासा आता प्रशासनाने करण्याची गरज आहे. इराणविरोधात अमेरिका व इस्त्राईल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका मनोरा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. शहरालगतच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल व गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. 

अचानक वाढलेल्या मागणीमुळे काही पेट्रोल पंपावरील (Petrol Crisis) इंधन साठा संपुष्टात येत आहे. तेंव्हा रांगेत दोन ते तीन तास उभे राहूनही इंधन मिळत नसल्याने अनेक वाहनधारक व शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत आहे. आम्ही कामधंदा सोडून रांगेत उभे आहोत. पण नंबर आल्यावर पेट्रोल, डिझेल संपल्याचे सांगण्यात येत आहे. अश्या भावना संतप्त नागरिका व्यक्त करीत आहेत. ज्या पंपावर साठा शिल्लक आहे तिथे रात्री उशिरापर्यंत वाहनधारक नागरिकांची डिझेल व पेट्रोल घेण्यासाठी झुंबड उडत आहे.


 

संबंधित सामग्री

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

Manora Drought declared: गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात असताना शासनाने काढलेला दुष्काळी शासन निर्णय 'कोरड्या दुष्काळाचा कोरडा जीआर' आहे. दुष्काळी उपाययोजना

Sep 28, 2026
तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

Manora Tehsil Office: मानोरा शहरातील गजबजलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांपेक्षा भटक्या श्वानांचा मुक्त वावर वाढला असून, कामकाजाच्या वेळेतच या कुत्र्यांनी सरकारी कार्यालयात..

Sep 27, 2026
बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी मुक्काम एसटी बससेवा २५ सप्टेंबरपासून सुरू; भाविकांना दिलासा. पोहरादेवीत एसटी डेपो उभारण्याची मागणी.

Sep 26, 2026
मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुक्यात अनेक गावांत रात्री संशयास्पद ड्रोन दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती. प्रशासनाने ड्रोनच्या हालचालींबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी.

Sep 26, 2026