Drone Sightings

मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुक्यात अनेक गावांत रात्री संशयास्पद ड्रोन दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती. प्रशासनाने ड्रोनच्या हालचालींबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी.

मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

Drone Sightings

अनेक गावात हाच प्रकार; प्रशासनाने माहिती देण्याची गरज; माजी जि.प. अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले यांची मागणी

मानोरा : मानोरा तालुक्यातील गिरोली, हिवरा बु., दापुरा, कारप व अनेक गावांच्या परिसरात रात्रीच्या सुमारास आकाशात संशयास्पद ड्रोन घिरट्या मारताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी हे ड्रोन दिसून येत असल्याने ते नेमके कोणत्या कारणासाठी फिरत आहेत, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिक रात्रभर जागरण करीत आहेत.

सध्या मानोरा तालुक्यात चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये आधीच चिंता सतावत आहे. हा प्रकार केवळ गिरोलीपुरता मर्यादित नसून मानोरा तालुक्यातील अनेक गावांच्या परिसरात हाच प्रकार घडत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. रात्रीच्या अंधारात लाल-हिरव्या लाईटसह फिरणारे हे ड्रोन पाहून चोरीच्या उद्देशाने तर घिरट्या घालत नाही ना, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रात्रीचे जागरण वाढले आहे.

या ड्रोनच्या हालचालींबाबत महसूल व पोलीस प्रशासन किंवा संबंधित यंत्रणेकडून नागरिकांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अधिकृत माहिती न मिळाल्याने अफवांना मोठा वाव मिळत असून भीती आणखी वाढत आहे.

हे ड्रोन कोणत्या यंत्रणेकडून आणि कोणत्या कारणासाठी उडविले जात आहेत, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. शेती सर्व्हे, नकाशा मोजणी, सुरक्षा यंत्रणेची तपासणी की इतर कोणते कारण आहे, याबाबत स्पष्ट व अधिकृत माहिती स्थानिक नागरिकांना द्यावी, जेणेकरून नागरिकांमधील भीती दूर होईल. प्रशासनाने याबाबत तातडीने खुलासा करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले यांनी केली आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026