पातूर मनरेगा प्रोजेक्ट

मनरेगा कामांमध्ये भ्रष्टाचार; सखोल चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल

Patur MNREGA Project: सुकळी येथील मनरेगा कामांमध्ये बनावट मजूरांची नावे दाखवून लाखो रु.चा अपव्यय झाल्याचा आरोप आहे. चौकशीची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे करताना गावकऱ्यांनी सखोल संशोधनाची मागणी

मनरेगा कामांमध्ये भ्रष्टाचार; सखोल चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल

Patur MNREGA Project

सुकळी येथील प्रकार : जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार

पातूर (Patur MNREGA Project) : पातूर पंचायत समिती अंतर्गत सुकळी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संकेत गणेश वांडे व ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, नाला खोलीकरण, वृक्ष लागवड तसेच इतर विकास कामांमध्ये बनावट मजुरांची नावे दाखवून शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. कागदोपत्री दररोज सुमारे १०० मजूर कामावर असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात एवढ्या संख्येने मजूर उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या (Patur MNREGA Project) प्रकरणात रोजगार सेवक, ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने गैरप्रकार सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. विशेषतः वृक्ष लागवडीच्या कामात खोटे फोटो, बनावट हजेरी नोंदी व कागदोपत्री कामे दाखवून निधी अपहार केला जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

तसेच, सुकळी येथील सार्वजनिक सभागृह ते स्मशानभूमी दरम्यान प्रत्यक्षात वृक्ष लागवड न करता मस्टर व डिमांड काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. गावकऱ्यांनी या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

 उच्चस्तरीय चौकशी समितीची मागणी
सुकळी येथे मनरेगा (Patur MNREGA Project) अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये बनावट मजूर दाखवून लाखो रुपयांचा निधी अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

NEET' पेपरफुटी व विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकारवर जोरदार प्रहार

NEET' पेपरफुटी व विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकारवर जोरदार प्रहार

Adv. Sahebrao More: देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट पेपरफुटीच्या घटनांवरून प्रसिद्ध समाजसेवक ॲड. साहेबराव मोरे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत उग्र शब्दांत टीका

Jul 22, 2026
सोनम वांगचुक संसद मोर्चात सहभागी होणार? रुग्णालयातून डिस्चार्जची केली विनंती

सोनम वांगचुक संसद मोर्चात सहभागी होणार? रुग्णालयातून डिस्चार्जची केली विनंती

Sonam Wangchuk Parliament march: सोनम वांगचुक यांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून डिस्चार्जची विनंती, त्यांची प्रकृती आता सामान्य असून त्यांना संसद मोर्चात ('संसद चलो' सहभागी होण्याची इच्छा

Jul 20, 2026
बोगस बियाणे विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

बोगस बियाणे विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

Bogus seeds Protest: हिंगोली जिल्ह्यातील क्रांतिकारी शेतकर्यांच्या संघटनाने अदृष्टपणे बोगस बियाणांची विक्री आणि कृषकांना लुटण्याच्या आरोपांवर प्रतिवाद करून कार्यालयाच्या परिसरात नोटा वितरण

Jul 15, 2026
दोन आमदारातील ‘फिलगुड’ मुळे हिंगोलीतील विकासाला मिळेल बुस्टर डोस?

दोन आमदारातील ‘फिलगुड’ मुळे हिंगोलीतील विकासाला मिळेल बुस्टर डोस?

Hingoli Municipal Council: हिंगोलीचे आमदारी तान्हाजीराव मुटकुळे आणि संतोष बांगर यांनी एकत्रितपणे रेल्वे उड्डाणपूल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व इतर कामांचे भौमिपूजन

Jul 12, 2026
चिचोली निळोबा येथे छापा; अवैध सावकारीचे प्रकरण उघडकीस

चिचोली निळोबा येथे छापा; अवैध सावकारीचे प्रकरण उघडकीस

Chicholi Niloba Illegal Raid: ऑंधा तालुक्यातील चिचोली निळोबा येथील शेतकरी सुंदरराव मोरे यांच्यावर अवैध करार मिळवून घेण्याच्या धमकीने शेतातील जमीनच्याही खरेदी होण्याचा प्रयत्न

Jul 09, 2026