कॉकरोच जनता पार्टी अभिजीत दिपके

टेलीग्रामवरूनच क्रांतीचा झेंडा; कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचा सरकारला डिजीटल टोला

CJP Abhijeet Deepke: हिंगोलीमध्ये संतुक पिंपरीला आलेल्या अभिजीत दिपकेच्या भाषणात दिसून येते की, टेलिग्राम सारखे माध्यम तरुणांना राजकारणासाठी एकत्र करतात आणि लोकशाही वादसंगतींमध्ये

टेलीग्रामवरूनच क्रांतीचा झेंडा; कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचा सरकारला डिजीटल टोला

CJP Abhijeet Dipke

हिंगोली (CJP Abhijeet Dipke) : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे त्यांच्या हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथील मुळगावी १९ जून रोजी आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना डिजीटल चळवळीने अवघ्या काही दिवसातच देशभरात वादळ निर्माण झाले असल्याचे सांगितले.

संतुक पिंपरी येथे ‘कॉक्रोज जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके (CJP Abhijeet Dipke) हे आले असता त्यांनी सांगितले की, टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर तरुणांच्या आवाजासाठी करणे किती महत्त्वाचे आहे, यावर ठाम भूमिका मांडली आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या १५ मे २०२६ च्या ‘झुरळ’ वक्तव्यानंतर जन्माला आलेल्या या डिजिटल चळवळीने अवघ्या काही दिवसांतच देशभरात वादळ निर्माण केले. अभिजीत दिपके यांनी टेलिग्रामचा उल्लेख करत सांगितले की, मुख्य प्रवाहातील राजकारणातून डावलल्या गेलेल्या, बेरोजगार, ‘क्रॉनिकली ऑनलाइन’ तरुणांसाठी टेलिग्रामसारखी व्यासपीठे आता नव्या राजकीय चर्चेची आणि संघटनाची केंद्रे बनली आहेत.

त्यांच्या मते, व्यवस्थेवरील टीकेला ‘परजीवी’ ठरवण्याऐवजी टेलिग्रामसारख्या माध्यमातून लाखो तरुण एकत्र येत प्रश्न विचारत आहेत, हेच खरे लोकशाहीचे लक्षण आहे. दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर आणि पुणे विद्यापीठातील निदर्शनांनंतर दिपके (CJP Abhijeet Dipke) यांनी स्पष्ट केले की, ‘कॉक्रोज जनता पार्टी’ निवडणूक लढवण्यासाठी नाही, तर पेपर लीक, बेरोजगारी आणि तरुणांच्या मानसिक तणावावर डिजिटल माध्यमातून राजकीय विमर्श घडवण्यासाठी आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यभरातील तरुण वर्गात चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

संबंधित सामग्री

बंजारा विरासत संघाचा संवाद मेळावा उत्साहात

बंजारा विरासत संघाचा संवाद मेळावा उत्साहात

Banjara Heritage Sangh: बंजारा समाजाची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक प्रगती अधिक गतिमान करण्यासाठी बंजारा विरासत संघाच्यावतीने नुकतेच युवकांनी संवाद मेळाव्याचे आयोजन

Aug 18, 2026
छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामवर CSAM विक्रीचा पर्दाफाश; डार्कनेट कनेक्शनचा संशय

छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामवर CSAM विक्रीचा पर्दाफाश; डार्कनेट कनेक्शनचा संशय

​​​​​​​छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रांची विक्री केल्याचा गंभीर प्रकार सायबर पोलिसांनी उघड केला आहे.

Aug 05, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवे सोशल मीडिया नियम लागू; उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवे सोशल मीडिया नियम लागू; उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई

सरकारी कर्मचाऱ्यांकडून सोशल मीडियाचा वाढता वापर, शासकीय माहिती गळतीची प्रकरणे आणि अधिकृत पदाचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य शासनाने नवी नियमावली लागू केली आहे.

Jul 29, 2026
भूजल संवर्धनासाठी विद्यार्थ्यांमध्ये जलजागृतीचा संदेश

भूजल संवर्धनासाठी विद्यार्थ्यांमध्ये जलजागृतीचा संदेश

Hingoli Groundwater Conservation: हिंगोलीत भूजल सर्वेसखण संस्थेच्या पहिल्या दिवसीय कार्यक्रम म्हणून जलसाक्षरतेच्या आणि पाणीच्या गुणवत्तेच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

Jul 16, 2026
स्वराज्य सेवा  प्रतिष्टान' ला २०२६ चा सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार

स्वराज्य सेवा  प्रतिष्टान' ला २०२६ चा सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार

Someshwar Pusatkar Award: विदर्भातील ऐतिहासिक किल्ले , प्राचीन मंदिरं, शेकडो वर्ष जुन्या विहिरी, बारव  व जुन्या ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंचे संवर्धन करण्यासोबतच त्या ऐतिहासिक वास्तूंचा देदीप्यमान

Jul 15, 2026