पिकअप–मोटारसायकल अपघात

भरधाव पिकअप–मोटारसायकलची समोरासमोर धडक; युवकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

Pickup-Bike Accident: उदगीर तालुक्यातील उदगीर–लातूर महामार्गावर लोहारा व करडखेड गावांदरम्यान भरधाव पिकअप व मोटारसायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला

भरधाव पिकअप–मोटारसायकलची समोरासमोर धडक; युवकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

Pickup-Bike Accident

उदगीर (Pickup-Bike Accident) : उदगीर तालुक्यातील उदगीर–लातूर महामार्गावर लोहारा व करडखेड गावांदरम्यान भरधाव पिकअप व मोटारसायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर उदगीर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप वाहन (क्र. एमएच-४४-यू-२१६९) हे लातूरहून उदगीरकडे येत होते, तर मोटारसायकल (क्र. एमएच-२४-वाय-२८३९) उदगीरहून लातूरकडे जात होती. मोटारसायकलवरील दोन्ही युवक खाजगी कामानिमित्त लातूरकडे जात असताना लोहारा व करडखेड गावांदरम्यान दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलस्वार हवेत उडून पिकअपच्या पुढील काचा फोडत थेट वाहनाच्या आत जाऊन पडला. या भीषण अपघातात उमर मगदुम शेख (वय २२), रा. मरसांगवी, ता. जळकोट, सध्या मुक्काम बनशेळकी रोड, उदगीर यांचा जागीच मृत्यू झाला. तर अलीम अकबर मुंजेवार हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी अलीम अकबर मुंजेवार यांना उपचारासाठी उदगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या (Pickup-Bike Accident) दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या हृदयद्रावक अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026